Join us

डोक्यावरचे केस फारच पांढरे झाले? डाय न लावता हा घरगुती हेअर कलर लावा, काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:21 IST

How To Get Black Hairs Naturally : सगळ्यात आधी मेथीचे दाणे दही आणि एलोवेरा जेल घालून बारीक वाटून घ्या.

केस पांढरे होणं ही सध्याच्या वातावरणातील खूपच कॉमन स्थिती आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती केमिकल्सयुक्त हेअर कलर आपल्या केसांना लावते. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. पण केसांचे नुकसान होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पांढरे केस लपवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता.  (How To Get Black Hairs Naturally)

ज्यामुळे पांढरे केस लपवणं एकदम सोपं  होईल. या हेअर मास्कमुळे फक्त केस काळेच होत नाहीत तर पांढरे केस लपवण्यासही मदत होते. ज्यामुळे केस हेल्दी, शायनी राहतात. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी होममेड हेअर मास्क कसा वापरतात ते समजून घेऊ. (Home Remedies To Get Black Hairs Naturally)

केसांना काळे करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी हेअर मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाला काही घरगुती गोष्टींची आवश्यकता असेल. एक चमचा हळद, एक चमचा इंडीगो पावडर, एक ते दोन चमचे दही, भिजवलेले मेथीचे दाणे, एक चमचा कॉफी, एक चमचा एलोवेरा जेल.

होममेड हेअर मास्क बनवण्याची योग्य पद्धत

1) सगळ्यात आधी मेथीच्या दाणे दही आणि एलोवेरा जेल घालून बारीक वाटून घ्या. नंतर लोखंडाचा तवा किंवा कढईत हळदीची पावडर घालून भाजून घ्या. रंग काळा होईपर्यंत भाजून  घ्या. नंतर ही काळी पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

2) तयार दही आणि एलोवेरा जेल मेथीच्या पेस्टमध्ये घालून इंडीगो आणि हळदीच्या पावडरसोबत मिसळा यात १ चमचा कॉफीसुद्धा घाला. सर्व पदार्थ चमच्याच्या मदतीने एकजीव करा.

जेवणात १ वाटी ही डाळ खा, बॅड कोलेस्टेरॉल घटेल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, वजन भराभर घटेल

3) केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. ज्या ठिकाणी केस पांढरे असतील तर त्या ठिकाणी व्यवस्थित लावा. जवळपास ३ ते ४ तासांसाठी तसंच ठेवून द्या.

4) नंतर केस व्यवस्थित धुवून घ्या. केमिकल्सचा वापर न करता सर्व केस लगेच काळे होतील. याशिवाय केसांमध्ये शाईन येईल आणि केस सॉफ्ट होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी