हिवाळा म्हटलं की, त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपल्या सगळ्यांनाचं सतावतात. थंडीच्या दिवसांत गारठ्याने त्वचा कोरडी पडणे, भेगा पडणे, त्वचा सोलवटून निघणे, त्वचा काळी पडणे अशा त्वचेच्या अनेक समस्या असतात. हिवाळ्यातील त्वचेचा अशा अनेक समस्या असल्या तरीही पायांच्या टाचांना भेगा पडणे ही त्वचेची सर्वात मोठी आणि कॉमन समस्या आहे. थंडीच्या दिवसांत अनेकदा भेगा पडलेल्या टाचांचा खूप त्रास होतो. पायांच्या टाचांना (How to care for dry, cracked heels) भेगा पडल्यामुळे केवळ पायांचे सौंदर्यच (Remove Cracked Heels By Using Wheat Flour) खराब होत नाही तर वेदना देखील तितक्याच जास्त होतात(easy remedy to cure cracked heels using wheat flour).
वेळीच या फुटलेल्या टाचांकडे लक्ष दिले नाही तर ही समस्या अधिक वाढत जाऊन या टाचांना पडलेल्या भेगांमधून रक्त देखील येऊ शकते. अशा फुटलेल्या टाचांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी एक घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो. फुटलेल्या टाचांवर असरदार उपाय म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा वापर करू शकतो. फुटलेल्या टाचा किंवा हिवाळ्यात कोरडी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात.
पायांच्या टाचांना भेगा पडल्यास गव्हाच्या पिठाचा कसा वापर करावा...
१. गव्हाचे पीठ आणि हळद :- टाचांच्या भेगा आणि काळेपणा दूर करण्यासाठी गव्हाचे पीठ आणि हळदीची पेस्ट हा एक उत्तम उपाय आहे. हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि त्वचा उजळविणारे गुणधर्म असतात, जे पिठात मिसळल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होते. २ चमचे गव्हाच्या पिठात १ चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट टाचांवर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने टाचा स्वच्छ धुवून घ्या. मग आपल्या टाचांना मॉइश्चरायझरने हायड्रेट करा.
आयुर्वेदातील पारंपरिक पद्धतीने करा तुपाचे नॅचरल मॉइश्चरायझर, हिवाळ्यात त्वचेच्या समस्या होतील दूर...
२. गव्हाचे पीठ आणि दूध :- गव्हाचे पीठ आणि दूध यापासून तयार केलेला स्क्रब पायांच्या टाचांचे स्क्रबिंग करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरु शकतो. दूध आणि पिठाचा स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. दुधामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड मृत पेशी काढून त्वचा मऊ करते. २ चमचे गव्हाच्या पिठात १ चमचा कच्चे दूध आणि १ चमचा मध मिसळा. ५ ते ७ मिनिटे स्क्रबप्रमाणे टाचांवर हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
३. गव्हाचे पीठ आणि लिंबाचा रस :- लिंबाच्या रसात असलेले नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. त्यात सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे टाचांवरील काळे डाग कमी होतात. लिंबू मृत त्वचा काढून टाकून नवीन आणि निरोगी त्वचे येण्यास फायदेशीर ठरते. याचा नियमित वापर केल्याने टाचांची त्वचा मऊ आणि चमकदार होते. २ चमचे गव्हाच्या पिठामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि थोडे खोबरेल तेल घाला. हे मिश्रण एकजीव करून टाचांवर लावा आणि १० ते १५ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने टाचा धुवा आणि त्वचा मऊ करण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
४. गव्हाचे पीठ आणि एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि त्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेला आराम देतात. ते कोरड्या आणि क्रॅक झालेल्या त्वचेला मॉइश्चरायझ करून मऊ करण्यास मदत करतात. पीठ त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. २ चमचे गव्हाच्या पिठात प्रत्येकी १ चमचा एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण टाचांवर लावा आणि १५ मिनिटे ते टाचांवर तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने धुवा.
थंडीने बाटलीतील तेल गोठलं? सोप्या झटपट ५ टिप्स, तेल गरम न करताही होईल पातळ-प्रवाही...
५. गव्हाचे पीठ आणि साखर :- जर तुमच्या टाचांना अधिक जास्त भेगा पडल्या असतील. याचबरोबर, त्वचा अधिक जास्त कोरडी पडून रखरखीत झाली असेल तर गव्हाचे पीठ आणि साखरेचा स्क्रब हा एक उत्तम उपाय आहे. साखर त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते , तर मैदा त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. २ चमचे गव्हाच्या पिठामध्ये प्रत्येकी १ चमचा साखर आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा. या मिश्रणाने टाचांना हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा. पाण्याने धुतल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा.
खोबरेल तेलात मिसळा किचनमधील २ सिक्रेट पदार्थ, केसांच्या अनेक समस्यांवर एकच असरदार सोल्युशन...