हल्ली प्रत्येकाच्याच मागे कामाची एवढी धावपळ असते की त्यातून आपल्या त्वचेची काळजी घ्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. त्यात बऱ्याच जणांच्या आहारातूनही त्वचेला पोषक पदार्थ मिळत नाहीत. हल्ली प्रत्येकाचीच स्ट्रेस लेव्हलही खूप वाढलेली आहे. त्याचाही नकारात्मक परिणाम त्वचेवर होतोच. शिवाय धूळ, प्रदुषण, ऊन या गोष्टीही त्वचेसाठी नुकसानकारक ठरतात. अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. डोळ्यांभोवती, कपाळावर बारीक सुरकुत्या दिसतात. त्यामुळे मग कमी वयातच उगाच वयस्कर झाल्यासारखे वाटते (how to do skin botox at home?). असं आपल्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर हा एक सोपा उपाय लगेचच घरच्याघरी करायला सुरुवात करा.(simple tricks and tips to get rid of fine lines or wrinkles from skin)
त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी घरच्याघरी बोटॉक्स ट्रिटमेंट
त्वचेला घरच्याघरी बोटॉक्स ट्रिटमेंट देऊन त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या कशा कमी कराव्या, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ skingurudivya या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
वटपौर्णिमा : भली मोठी मेहेंदी काढायला वेळच नाही? १ ट्रिक, मेहेंदी काढल्यासारखे लालचुटूक होतील हात
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की थोडेसे जवळ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. यानंतर एका भांड्यामध्ये १ चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि १ चमचा जवसाची पावडर एकत्र करा.
त्यात पाणी घालून हे मिश्रण गॅसवर उकळायला ठेवा. हळूहळू पाणी घट्ट होऊन जेलीसारखा पदार्थ तयार होईल. यानंतर गॅस बंद करा. आता मिश्रण थंड झाल्यानंतर ते तुमच्या चेहऱ्याला लावा.
कॅज्युअल लूकमध्येही दिसाल अनुष्का शर्मासारखं सुपरकूल! पाहा half tucked shirt मधले तिचे कमाल लूक
१५ ते २० मिनिटे ते चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने चोळून चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्याच केवळ कमी होणार नाहीत तर टॅनिंग कमी होऊन चेहऱ्यावरही छान ग्लो येईल. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करावा. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.