Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्लरमध्ये १००० रुपये द्यावे लागतात ते पेडिक्युअर घरी करा, स्वयंपाकघरातील ५ गोष्टी- पाय होतील स्वच्छ-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2026 11:54 IST

Best kitchen ingredients for soft feet: Feet whitening home remedies marathi: पार्लरमध्ये तासनतास बसण्याऐवजी घरच्या घरी आरामात बसून पाय स्वच्छ आणि सुंदर कसे बनवायचे.अवघ्या काही मिनिटांत तुमचे पाय एखाद्या मॉडेलसारखे सुंदर दिसू लागतील.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे तळपायांना भेगा पडण्याचे प्रमाण वाढते. अनेकांना उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळे पाय काळे पडणे, भेगा पडण्याच्या समस्या अधिक वाढतात, ज्यामुळे पाय घाण दिसतात. आपण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी जितका वेळ आणि पैसा खर्च करतो, तितके लक्ष पायांकडे देत नाही.(Pedicure ghari kase karave) दिवसभर धावपळ करणे, धूळ, प्रदूषण आणि उन्हामुळे पाय काळवंडतात, टाचांना भेगा पडतात आणि त्वचा निस्तेज होते. या समस्यांवर उपाय म्हणून आपण पार्लरमध्ये जाऊन 'पेडिक्युअर' (Pedicure) करतो, ज्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. पार्लरसारखा निखार आणि सुंदर पाय आपल्या स्वयंपाकघरातील केवळ ५ गोष्टी वापरून मिळवू शकता. (Gharguti pedicure tips marathi)घरच्या घरी पेडिक्युअर करणे केवळ किफायतशीर नाही तर ते पूर्णपणे नैसर्गिकही आहे. केमिकलमुक्त घटकांमुळे पायांची त्वचा सुरक्षित राहते आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो.(Home spa for feet with natural items) रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ काढून जर आपण हा उपाय केला, तर तुमचे पाय काचेसारखे चमकू लागतील. पार्लरमध्ये तासनतास बसण्याऐवजी घरच्या घरी आरामात बसून पाय स्वच्छ आणि सुंदर कसे बनवायचे.अवघ्या काही मिनिटांत तुमचे पाय एखाद्या मॉडेलसारखे सुंदर दिसू लागतील.

५ मिनिटांत ५ व्यायाम, ब्रा फॅट कमी करण्यासाठी सकाळी करा 'एवढंच', पाठीवरचे फॅट्सही होईल कमी

घरी पेडिक्युअर करण्यासाठी आपल्याला ५ गोष्टींचा वापर करावा लागेल. यासाठी लिंबू, बेकिंग सोडा, मीठ, साखर आणि खोबऱ्याचे तेल लागेल. याचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या पायांच्या नखांवरील नेलपॉलिश काढून टाका. नंतर एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. या पाण्याच चमचाभर बेकिंग सोडा, थोडे मीठ आणि लिंबाचा रस घाला. १० ते १५ मिनिटे पाय पाण्यात बुडवून ठेवा. लिंबाच्या अर्ध्या सालीने नखे आणि टाचा घासा. त्यानंतर साखर आणि तेलाच्या मिश्रणाने ५ मिनिटे पायांना स्क्रब करा. प्युमिक स्टोन किंवा जुन्या टूथब्रशने टाचांवरील मृत त्वचा काढून टाकता येईल. नंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करा. नंतर खोबऱ्याच्या तेलाने हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा. 

लिंबू हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे. यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे पायांवरील काळवंडलेपणा आणि टॅनिंग दूर करण्यास मदत होते. पायांच्या नखांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबू अत्यंत प्रभावी आहे. बेकिंग सोडा एक्सफोलिएटर आहे. कोमट पाण्यात बेकिंग सोडा टाकल्याने पायांची मृत त्वचा मऊ होते आणि डेड स्किन निघण्यास मदत होते. यामुळे पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल. कोमट पाण्यात मीठ टाकून पाय ठेवल्याने केवळ थकवा दूर होत नाही, तर पायांच्या नसांना आराम मिळतो. मीठ पायांमधील सूज कमी करण्यास आणि बॅक्टेरिया मारण्यास मदत होते. साखर आणि खोबऱ्याचे तेल पायांवर स्क्रब करून लावल्याने त्वचेला पोषण मिळते आणि भेगा पडण्यापासून रोखण्यास मदत होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : DIY Pedicure: Get salon-like feet at home with 5 kitchen ingredients.

Web Summary : Save money with a DIY pedicure using kitchen ingredients like lemon, baking soda, salt, sugar, and coconut oil. These natural ingredients help exfoliate, brighten, and moisturize feet, leaving them clean, soft, and beautiful.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी