पावसाळ्यात घाणीच्या पाण्यामुळे आपले पाय अधिक खराब होतात. पायात घाण साचते त्यामुळे नखे देखील खराब होतात. (Beauty Tips) त्वचेची जितकी काळजी महत्त्वाची आहे तितकीच आपल्या पायांची देखील काळजी आपण घ्यायला हवी. बऱ्याचदा आपण पायांकडे दुर्लक्ष करतो, घाणीच्या पाण्याने पाय खराब होतात.(Dry foot care solution) नखांमध्ये माती किंवा घाण साचते आणि बोटे दुखू लागतात.(Rashmika Mandanna beauty tips) अनेकदा पायांना चप्पल किंवा सॅण्डलमुळे पायांना जखमा होतात. चप्पलांच्या रेघा पायांवर उमटल्यामुळे पाय काळे, खडबडीत आणि निर्जीव दिसतात. (Soft feet home remedy)
आपले पाय आणि टाचा सुंदर दिसण्यासाठी महागड्या पार्लरमध्ये जाऊन आपण पेडिक्युअर करतो.(Foot care in monsoon) यासाठी आपल्याला अधिक पैसे देखील खर्च करावे लागतात.(Herbal remedy for rough heels) परंतु, साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या फॅन्सना घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी काही टिप्स दिल्या. ज्यामुळे भेगाळल्या टाचा मऊ होण्यास मदत होतील.
कोरियन सिल्की केसांसाठी तांदळाचं पाणी भसाभस लावताय? आवरा, ‘असं’ लावलं तरच होईल फायदा
रश्मिका म्हणते मी शूटमध्ये अधिक व्यस्त असते. त्यामुळे मला स्वत:कडे फारसे लक्ष देता येत नाही. दिवसभराच्या कामामुळे पुन्हा पार्लरमध्ये तासंतास बसणं काही जमत नाही. अशावेळी पायांची काळजी घेण्यासाठी मी कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट टाकते. यामध्ये पाय दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवते. ज्यामुळे सर्व थकवा नाहीसा होतो.
एप्सम मीठात एकप्रकारचे खनिजे संयुग आहेत. यात मॅग्नेशियम आणि सल्फेट असते. जे क्रिस्टल्सच्या स्वरुपात आढळते. हे गरम पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास स्नायूंमधील वेदना कमी होतात. तसेच त्वचेसाठी फायदेशीर असते.
केस आहे की खराटा? गळणाऱ्या-ड्राय केसांना लावा ‘या’ पांढऱ्या फुलाचं तेल-सोपा उपाय
रश्मिका म्हणते जेव्हा खूप जास्त प्रमाणात थकवा येतो तेव्हा मी पाण्यात मीठ घालून आंघोळ करते. यामुळे शरीरावर साचलेला घाम, प्रदूषण, धूळ साफ करण्यास मदत करते. यात असणारे मॅग्नेशियम आणि सल्फेट शरीरातील छिद्रे ओपन करतात. ज्यामुळे साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. या मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंच्या वेदना आणि कडकपणापासून आराम मिळतो. रक्ताभिसरण सुधारते तसेच सूज कमी होण्यास मदत करते. त्वचेच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.