हिवाळा सुरू झाला की त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आता या दिवसांत त्वचा छान मॉईश्चराईज राहावी म्हणून आपण आंघोळ झाल्यावर किंवा रात्री झोपण्यापुर्वी त्वचेला वेगवेगळे क्रिम लावतो, तेल लावतो. पण हे सगळं करत असताना पायाकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग या दिवसांत पाय खूप खराब होतात. तळपाय कोरडे पडून त्यांना भेगा पडतात. तर पायाचा वरचा भाग काेरडा पडून काळवंडून जातो (3 steps pedicure at home). म्हणूनच पाय स्वच्छ करण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (how to do pedicure at home?). अगदी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर केल्यासारखा छान इफेक्ट मिळेल.(pedicure for dry and tanned feet)
घरच्याघरी पेडिक्युअर कसं करावं?
१. पेडिक्युअरची सगळ्यात पहिली स्टेप करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, एखादा चमचा शाम्पू आणि १ चमचा खोबरेल तेल घाला. आता १० मिनिटांसाठी या पाण्यामध्ये पाय बुडवून बसा. पायांना तर बरं वाटेलच पण गरम पाण्यात पाय बुडवल्यामुळे स्ट्रेसही कमी झाल्यासारखा वाटेल.
कोण म्हणतं रेड सॉस पास्ता करणं अवघड आहे? ही घ्या सोपी रेसिपी- १५ मिनिटांत पास्ता तयार...
२. आता दुसरी स्टेप करण्यासाठी तुमच्या घरात असलेलं कोणतंही टुथपेस्ट घ्या. टुथपेस्ट वापरून आपण पायाचे नख स्वच्छ करून घेणार आहोत. यासाठी टुथपेस्ट नखांना लावून घ्या. लिंबू मधोमध कापा आणि त्यावर बेकिंग सोडा टाकून त्याने नखं घासा. यामुळे नखांवरचा काळेपणा कमी होऊन नखं स्वच्छ होतील.
३. पायांचा काळवंडलेपणा कमी करून पाय स्वच्छ करण्यासाठी आता पायांना स्क्रबिंग करा. यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा साखर, १ चमचा भाजलेली हळद आणि १ चमचा बेकिंग सोडा घ्या.
केस पातळ झाले? शाम्पू, तेल बदलून उपयोग नाही, 'हे' पदार्थ खा- केस होतील दाट
थोडंसं गुलाब पाणी आणि खोबरेल तेल टाकून सगळे पदार्थ कालवून घ्या आणि या मिश्रणाने पायाला मालिश करा. पायांवरची डेडस्किन, टॅनिंग निघून पाय एकदम स्वच्छ होतील.
४. यानंतर पेट्रोलियम जेली आणि खोबरेल तेल एकत्र करून पायाला मसाज करा. पाय खूप स्वच्छ, मऊ झाल्यासारखे दिसतील. तळपायाच्या भेगाही कमी होतील.
