Lokmat Sakhi >Beauty > फक्त २० रुपयांत चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! कच्चं दूध चेहऱ्याला 'असं' फक्त लावा

फक्त २० रुपयांत चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! कच्चं दूध चेहऱ्याला 'असं' फक्त लावा

How to Do Milk Facial at Home: घरच्याघरी डायमंड फेशियलसारखा ग्लो हवा असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(simple home hacks to get diamond facial like glow at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 17:43 IST2025-09-10T16:02:24+5:302025-09-10T17:43:25+5:30

How to Do Milk Facial at Home: घरच्याघरी डायमंड फेशियलसारखा ग्लो हवा असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(simple home hacks to get diamond facial like glow at home)

how to do milk facial at home, simple home hacks to get diamond facial like glow at home | फक्त २० रुपयांत चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! कच्चं दूध चेहऱ्याला 'असं' फक्त लावा

फक्त २० रुपयांत चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! कच्चं दूध चेहऱ्याला 'असं' फक्त लावा

Highlightsहा मास्क चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर माॅईश्चराईज करा. तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. 

कधी कधी चेहरा खूप डल आणि ड्राय होतो. असं झाल्यावर पार्लरमध्ये जाऊन कोणतंही महागडं फेशियल किंवा क्लिनअप करण्याऐवजी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कच्चं दूध लागणार आहे. कच्चं दूध घेऊन चार स्टेप्स मध्ये पुढे सांगितलेल्या पद्धतीनुसार घरीच मिल्क फेशियल करून पाहा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल (how to do milk facial at home?). त्वचेवरचं टॅनिंग, ड्रायनेस जाऊन त्वचा छान माॅईश्चराईज आणि मुलायम होईल.(simple home hacks to get diamond facial like glow at home)

 

घरच्याघरी मिल्क फेशियल कसं करायचं?

१. मिल्क फेशियल करण्याची पहिली स्टेप म्हणजे क्लिंझिंग. कोणतंही फेशियल करण्यापुर्वी आपण चेहरा स्वच्छ करून घेतो. तसाच तो या फेशियलमध्येही करायचा आहे. ते करण्यासाठी थंड असणारं कच्चं दूध घ्या. त्यामध्ये कापूस बुडवा आणि कापसाचा बोळा चेहऱ्यावर फिरवून चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवरील सगळी घाण, मळ कमी होतो.

नवरात्रीसाठी अखंड दिवा घ्यायचा? बघा २ सुंदर पर्याय- वात वर घेताना दिवा विझण्याची भीतीच नाही

२. दुसरी स्टेप करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये तांदळाचं पीठ घालून ते व्यवस्थित कालवून घ्या. आता हा झाला तुमचा स्क्रब तयार. या स्क्रबने चेहऱ्याला एखाद्या मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा धुवून टाका. डेडस्किन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स निघून जाण्यास मदत होते. 

 

३. तिसरी स्टेप करण्यासाठी ॲलोव्हेरा जेल आणि कच्चं दूध एकत्र करून चेहऱ्याला ५ मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर कापसाने चेहरा पुसून घ्या.

नेहमीच गोड खावं वाटतं? ४ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा- Sugar Craving आपोआप कमी होईल

४. आता मिल्क फेशियलची सगळ्यात शेवटची स्टेप करून पाहा. यामध्ये आपल्याला चेहऱ्याला एक घरगुती फेसमास्क लावायचा आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये मिल्क पावडर आणि बेसन पीठ सम प्रमाणात घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. कच्चं दूध टाकून फेसमास्क तयार करा. हा मास्क चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर माॅईश्चराईज करा. तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. 


 

Web Title: how to do milk facial at home, simple home hacks to get diamond facial like glow at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.