दिवाळी ताेंडावर आली की घरोघरी स्वच्छता मोहिम सुरू होते. अगदी अंगणापासून ते स्वयंपाक घरापर्यंत घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. एरवी वर्षभर आपलं जिथे लक्ष देणं होत नाही, तो घरातला कोपराही अगदी लख्खं केला जातो. घरातला सगळा पसारा काढून घर अगदी लख्खं करण्याच्या कामात सगळ्यात जास्त मेहनत होते ती आपल्या हातांची. प्रत्येकवेळी धुळीतली कामं करताना किंवा घासण्या- पुसण्याची कामं करताना हातात ग्लोव्ह्ज घालायचं लक्षात राहात नाही. त्यामुळे मग धूळ, साबण, पाण्याचा वारंवार संपर्क यामुळे हात रखरखीत होऊन जातात. घर तर स्वच्छ होऊन चमकू लागतं पण हात मात्र काळवंडून गेलेले असतात. म्हणूनच आता हातांचं सौंदर्य पुन्हा खुलविण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..(3 tips to make your hands and palm soft)
हात कोरडे, रखरखीत झाले असल्यास काय उपाय करावा?
- १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा कॅस्टर ऑईल आणि बदाम तेलाचे काही थेंब एकत्र करा आणि रोज रात्री झोपण्यापुर्वी या तेलाने हाताला मसाज करा. हात मऊ पडतील.
केसांचं गळणं पाहून टेन्शन येतंय? बघा काय खायचं आणि केसांना काय लावायचं, केस गळणं बंद
- एका वाटीमध्ये १ चमचा खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १ टीस्पून गुलाबजल आणि ग्लिसरीनचे काही थेंब घाला. त्यातच थोडं ॲलोव्हेरा जेल घाला. हे चारही पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करा. एखाद्या क्रिमसारखं दिसणारं मिश्रण तयार होईल. हे मिश्रण आता हातांना चोळून मालिश करा. रोज रात्री झोपण्यापुर्वी काही दिवस हा उपाय करा. हात अगदी मऊ होतील.
- १ टीस्पून पिठीसाखर, १ टीस्पून मध आणि १ टीस्पून काॅफी पावडर हे पदार्थ एका वाटीमध्ये एकत्र करा. त्यात थोडं खोबरेल तेल आणि दही घाला. आता हे मिश्रण हातांवर चोळून लावा.
फक्त ३ पदार्थ एकत्र करून केसांना लावा- रखरखीत, कोरड्या झालेल्या केसांवर येईल छान चमक
हातावरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल आणि हात मऊ होतील. हा उपाय केल्यानंतर हाताला बदामाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल लावून मालिश करा. हात माॅईश्चराईज होतील.