दिवाळी सरली आणि आता लग्नसराई सुरू झाली आहे. आता लग्न म्हटलं की महिलांसाठी पार्लर, मेकअप, शॉपिंग या गोष्टी ओघाने आल्याच. त्याशिवाय इतरही अनेक कामं असतात. या सगळ्या कामांच्या धावपळीत पार्लरमध्ये जायला वेळ मिळतोच असे नाही. म्हणूनच चेहऱ्याचं सौंदर्य खुलविण्यासाठी घरच्याघरी काही उपाय केले तरी ते पुरेसे ठरतात आणि त्याचा त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. त्यापैकीच एक खास फेशियल आपण पाहणार आहोेत. हे फेशियल करण्यासाठी वापरण्यात येणारे बहुतांश पदार्थ तर आपल्या स्वयंपाक घरातच असतात...(How To Do Facial at Home?)
घरच्याघरी फेशियल कसं करायचं?
१. फेशियल करण्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे त्वचेचं क्लिंझिंग करून घेणे. म्हणजेच त्वचा स्वच्छ करणे. यासाठी एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्या. त्यात थोडं ग्लिसरीन आणि थोडं गुलाब पाणी घाला. यामध्ये कापूस बुडवून त्वचेला लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. यानंतर कापसाने चेहरा पुसून घ्या.
२. दुसरी स्टेप करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा मध आणि १ चमचा कच्चं दूध घ्या. कॉफीमुळे चेहऱ्यावर चमक येते. मधामुळे त्वचा हायड्रेटेड राहाते आणि दुधामधले घटक त्वचेला छान पोषण देतात. हा लेप चेहऱ्याला लावून ५ ते ७ मिनिटे मालिश करा आणि नंतर चेहरा पुसून घ्या.
३. यानंतर त्वचेला स्क्रब करा. त्यासाठी एका वाटीमध्ये टोमॅटो प्युरी घ्या. तिच्यामध्ये बेसन घाला आणि हा लेप त्वचेला लावून मालिश करा. साधारण १० मिनिटाने चेहरा धुवून घ्या. यामुळे डेडस्किन, टॅनिंग, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स निघून जातात आणि त्वचा स्वच्छ होते.
Skin Care: हिवाळ्यासाठी घरीच तयार करा नाईट क्रिम, थंडीत त्वचा कोरडी होणारच नाही
४. यानंतर त्वचेला छान फेसमास्क लावा. त्यासाठी १ केळ कुस्करून घ्या. त्यामध्ये थोडा मध आणि कच्चं दूध घाला. आता हा लेप चेहऱ्याला लावून ५ ते ६ मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून माॅईश्चराईज करा. बघा त्वचेमध्ये खूप छान फरक जाणवेल.
