Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॅचरल Botox ट्रिटमेंट देणारं जास्वंदाचं फूल! वय वाढलं तरी चेहरा राहील तरुण- टवटवीत, बघा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 09:30 IST

Skin Care Tips Using Hibiscus Flower: त्वचा कायम तरुण, टवटवीत ठेवायची असेल तर जास्वंदाच्या फुलाचा पुढे सांगितल्याप्रमाणे उपयोग करून पाहा..(benefits of hibiscus flower for skin)

ठळक मुद्देत्वचेवर दिसणाऱ्या बारीक सुरकुत्याही कमी होतील आणि त्वचा लवचिक होईल.

जास्वंदाचं एखादं छोटंसं रोप जवळपास सगळ्यांच्याच घरामध्ये किंवा घराच्या आसपास असतं. हे फूल देवाला तर आपण वाहतोच, पण ते केसांसाठीही चांगलं असतं हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचबरोबर जास्वंदाचं फूल आपल्या त्वचेसाठीही खूप गुणकारी ठरतं, हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. जर जास्वंदाच्या फुलाचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर ते त्वचेसाठी एखाद्या नॅचरल बोटॉक्स ट्रिटमेंटप्रमाणे काम करतं आणि त्वचेला अधिक तरुण, सुंदर ठेवतं (how to do Botox treatment at home using hibiscus flower?). त्यासाठी बघा नेमकं कशा पद्धतीने जास्वंदाचं फूल वापरायचं..(benefits of hibiscus flower for skin)

 

जास्वंदाचं सिरम किंवा टोनर कसं तयार करावं?

त्वचेसाठी उपयुक्त ठरणारं जास्वंदाचं सिरम किंवा टोनर तयार करण्यासाठी जास्वंदाची २ ते ३ फुलं घ्या. ती स्वच्छ धुवा आणि त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या.

घरीच तयार करा विकतपेक्षाही चवदार बटर, चमचाभर तूपात 'हा' पदार्थ घाला- १० मिनिटांत बटर तयार

आता एका पातेल्यामध्ये दिड कप पाणी घ्या. या पाण्यामध्ये जास्वंदाच्या पाकळ्या टाका आणि पाणी गॅसवर उकळायला ठेवा. १० ते १२ मिनिटे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर गाळून घ्या आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल फोडून टाका. 

 

आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दिवसातून दोन वेळा टोनर किंवा सीरम लावतो त्याप्रमाणे हे जास्वंदाचं पाणी तुमच्या चेहऱ्यावर शिंपडा. यामुळे त्वचेवरचे ओपन पोअर्स बंद होतील.

ॲनिमियाचा त्रास? हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? घ्या सोपे उपाय, HB वाढेल भराभर..

त्वचेवर दिसणाऱ्या बारीक सुरकुत्याही कमी होतील आणि त्वचा लवचिक होईल. चेहऱ्यावर कुठेही त्वचा लोंबकळताना दिसणार नाही. त्वचेचा टाईटनेस वाढेल. हा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. तसेच हा उपाय करण्यापुर्वी त्याची पॅचटेस्ट जरूर घ्या. हा उपाय simplecare.in या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hibiscus flower: Natural Botox treatment for youthful, radiant skin.

Web Summary : Hibiscus flowers offer natural Botox-like benefits for the skin. A simple homemade serum or toner made with hibiscus petals and vitamin E can tighten skin, reduce wrinkles, and minimize open pores. Regular use improves skin elasticity, offering a youthful and radiant complexion. Patch test recommended.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीफुलं