आपल्याला माहितीच आहेत की कित्येक अभिनेत्री त्यांचं वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून बोटॉक्स ट्रिटमेंट घेत असतात. त्यामुळेच तर त्या पन्नाशीच्या होऊनही अगदी पंचविशीतल्या तरुणीप्रमाणे सुंदर आणि देखण्या दिसतात. काही मोजके अपवाद सोडले तर बहुतांश जणी आता सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बोटॉक्स करायला प्राधान्य देतात. पण ही ट्रिटमेंट अतिशय महागडी असते. त्यामुळे सर्वसामान्यांना ती मुळीच परवडणारी नाही. म्हणूनच आता हा एक मस्त उपाय पाहा आणि घरच्याघरी तुमच्या त्वचेला बोटॉक्स ट्रिटमेंट द्या (how to do botox treatment at home?). त्यासाठी काय करायचं ते पाहा..(skin care tips to look young always)
घरच्याघरी स्किन बोटॉक्स ट्रिटमेंट कशी करायची?
स्किन बोटॉक्स घरच्याघरी कसं करायचं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ suparnatrikha या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
रात्री सारखी जाग येऊन सतत झोपमोड होते? ३ आजारांचा धोका- दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गाजर आणि आलं किसून घ्या आणि त्याचा साधारण एकेक चमचा रस घ्या. गाजरामध्ये बीटा कॅराटीन जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. याशिवाय आलं त्वचेतलं कोलॅजीन टिकवून ठेवण्यास मदत करतं. गाजर आणि आल्याचा रस एकत्र करून एका पातेल्यात घालून गॅसवर गरम करायला ठेवा.
हा रस गरम झाल्यानंतर त्यामध्ये १ टीस्पून कॉर्नस्टार्च घाला. त्वचेवरचे डार्क स्पॉट कमी करून त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी कॉर्नस्टार्च उपयुक्त ठरते.
'या' कारणांमुळे वाढतो Heart Failure चा धोका! ९० टक्के लोक यातली १ तरी चूक रोज करतात..
आता गॅस बंद करा आणि या मिश्रणामध्ये १ चमचा काेरफडीचा ताजा गर आणि १ चमचा मध घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. दररोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर हे क्रिम चेहऱ्याला लावा. फ्रिजमध्ये ठेवल्यास हे क्रिम ३ ते ४ दिवस चांगले टिकू शकते.