उन्हामुळे बऱ्याचदा असं होतं की चेहरा खूप काळवंडून जातो. टॅनिंग, डेडस्किन वाढलेलं असतं. त्यामुळे मग त्वचा खूप डल दिसू लागते. त्वचेवरची चमक कमी झाल्यासारखी वाटते. अशावेळी जर आपण ब्लीच केलं तर त्वचा बरीच स्वच्छ होऊ शकते. टॅनिंग, डेडस्किन निघून त्वचेवर छान चमक येऊ शकते. पण पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करायलाही अनेक जणींकडे वेळ नसतो. म्हणूनच मग अशावेळी घरच्याघरी स्वयंपाक घरातलेच साहित्य वापरून झटपट ब्लीज कसं करायचं ते पाहुया...(simple tricks to do bleach at home)
घरच्याघरी ब्लीच कसं करायचं?
१. बटाटा हा नॅचरल ब्लीचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्याचा वापर करून टॅनिंग नक्कीच कमी करता येते. त्यासाठी सगळ्यात आधी बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या.
काळ्या केसांसाठी कशाला महागड्या मेलॅनिनच्या गोळ्या खाता? ‘हे’ पदार्थ खा, म्हातारपणीही केस काळेभोर
साधारण २ चमचे बटाट्याचा रस असेल तर त्यात १ चमचा मध आाणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून ते चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी लेप सुकायला लागला की चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यानंतर त्वचेवर खूप छान चमक आलेली दिसेल.
२. दुसरा उपाय करण्यासाठी १ टेबलस्पून मिल्क पावडर घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून दही आणि अर्धा टेबलस्पून तांदळाचं पीठ घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करा. त्यानंतर त्याचा लेप चेहऱ्याला लावा. साधारण २० मिनिटांनी लेप धुवून टाका. त्यानंतर त्वचा मॉईश्चराईज करायला विसरू नका.
कितीही आवडत असले तरी उन्हाळ्यात 'हे ' पदार्थ जास्त खाऊ नका, पोटदुखीनं हैराण व्हाल
३. १ चमचा बटाट्याचा रस घ्या. त्यामध्ये १ चमचा दूध आणि अर्धा चमचा तांदळाची पावडर घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव केल्यानंतर चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी त्वचा धुवून टाका. त्वचेवर छान बदल झालेला असेल.
वरीलपैकी जो उपाय सोपा वाटेल तो करून पाहा. त्वचेवर नक्कीच छान परिणाम होईल. टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचा उजळण्यास मदत होईल.
Web Summary : Rejuvenate dull skin at home! Use potato juice with honey and lemon, or milk powder with yogurt and rice flour. These simple remedies brighten skin, remove tan, and leave a radiant glow. Try these easy methods for a refreshed complexion.
Web Summary : घर पर ही बेजान त्वचा को निखारें! आलू के रस को शहद और नींबू के साथ, या दूध पाउडर को दही और चावल के आटे के साथ इस्तेमाल करें। ये सरल उपाय त्वचा को चमकदार बनाते हैं, टैन हटाते हैं, और एक चमक छोड़ते हैं। ताज़ा रंगत के लिए इन आसान तरीकों को आजमाएं।