Lokmat Sakhi >Beauty > गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा

गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा

15 minute home facial : Reduce tanning at Home : Dark circles home remedies: काही घरगुती उपाय करुन पाहिले तर चेहरा १५ मिनिटांत स्वच्छ होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 14:53 IST2025-08-21T14:18:47+5:302025-08-21T14:53:48+5:30

15 minute home facial : Reduce tanning at Home : Dark circles home remedies: काही घरगुती उपाय करुन पाहिले तर चेहरा १५ मिनिटांत स्वच्छ होईल.

How to do a quick 15-minute facial at home festival season for glowing skin facial to reduce tanning and dark circles naturally | गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा

गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा

अवघ्या काही दिवसांत बाप्पाचे आगमन होईल. घरोघरो बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली असेल.(Skin care Tips) घर, काम आणि ऑफिसच्या गडबडीत आपल्याला स्वत:कडे लक्ष द्याला वेळ नसतो.(Home Facial) त्यात मुलांचा अभ्यास, शाळा इतर गोष्टींचा पसारा आवरेपर्यंत आपला दिवस संपतो.(Reduce Tanning at home) पण अनेकदा आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर इतर समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातील एक आपली त्वचा. (Skin Home Remedies) चेहरा हा आपले आरोग्य सांगतो. (Dark Circles home remedies)
चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, कोरडा-निस्तेज पडणे, टॅनिंग- डार्क सर्कल देखील वाढतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडे केमिकल्स उत्पादने वापरतो.(Tomato Face Pack) ज्याचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी आपण योग्य आहार आणि त्वचेची नीट काळजी घेतली तर आपल्याला फायदा होईल. पण काही घरगुती उपाय करुन पाहिले तर चेहरा १५ मिनिटांत स्वच्छ होईल. (Quick skincare tips)

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स- निस्तेजही दिसतो? बेसनाच्या पिठात कालवून १ पदार्थ लावा, आठवड्याभरात चेहऱ्यावर येईल ग्लो

स्वयंपाकघरात असणार्‍या काही वस्तूंच्या मदतीने आपण चेहऱ्यावर चमक आणू शकतो. या गोष्टी नैसर्गिक असल्याने त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा धोका देखील कमी होतो. यामुळे चेहरा लाल होत नाही, संसर्ग आणि ऍलर्जीच्या समस्या देखील कमी होतील. चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला टोमॅटो आणि मुलतानी मातीची गरज लागेल. या दोन पदार्थांच्या मदतीने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणू शकतो. यामुळे आपला चेहरा स्वच्छ दिसेल. 

यासाठी आपल्याला अर्ध्या टोमॅटोवर मुलतानी माती पसरवावी लागेल. सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा आणि टोमॅटोच्या रसातील मुलतानी माती चेहऱ्यावर चोळा. ज्यामुळे मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. तसेच व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होईल. टोमॅटो नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करतो. तसेच डाग देखील कमी होतात. मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा स्वच्छ करण्यास, त्वचेतील अतिरिक्त तेल शोषण्यास आणि मुरुम कमी करण्यास मदत करते. 


Web Title: How to do a quick 15-minute facial at home festival season for glowing skin facial to reduce tanning and dark circles naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.