Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ४ आठवड्यात केसांच्या समस्यांवर उपाय, करा हेअर डिटॉक्स! कोंडा-खाज आणि केस गळतीवर प्रभावी उपाय

४ आठवड्यात केसांच्या समस्यांवर उपाय, करा हेअर डिटॉक्स! कोंडा-खाज आणि केस गळतीवर प्रभावी उपाय

Hair Detox Tips : बॉडी डिटॉक्सबाबत आपण नक्कीच ऐकलं असेल, तसंच हेअर डिटॉक्स हे केसांसाठी खूप महत्वाचं ठरतं. यामुळे कोंडा, टाळूची खाज कमी होते आणि केसांची हरवलेली चमक पुन्हा मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:36 IST2026-01-20T10:39:06+5:302026-01-20T18:36:03+5:30

Hair Detox Tips : बॉडी डिटॉक्सबाबत आपण नक्कीच ऐकलं असेल, तसंच हेअर डिटॉक्स हे केसांसाठी खूप महत्वाचं ठरतं. यामुळे कोंडा, टाळूची खाज कमी होते आणि केसांची हरवलेली चमक पुन्हा मिळते.

How to detox hair in four weeks, know the simple steps to take care of hair | ४ आठवड्यात केसांच्या समस्यांवर उपाय, करा हेअर डिटॉक्स! कोंडा-खाज आणि केस गळतीवर प्रभावी उपाय

४ आठवड्यात केसांच्या समस्यांवर उपाय, करा हेअर डिटॉक्स! कोंडा-खाज आणि केस गळतीवर प्रभावी उपाय

Hair Detox Tips : चुकीची लाइफस्टाईल, हवी तशी काळजी न घेणे, खाण्या-पिण्यात गडबड या अशा कितीतरी गोष्टींमुळे अलिकडे प्रत्येक दुसरी व्यक्ती केसांच्या समस्यांनी त्रस्त आहे. केस गळणे असो किंवा अकाली पांढरे होणे या समस्या आता खूपच सामान्य झाल्या आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की ‘हेअर डिटॉक्स’ केल्याने या त्रासांपासून सुटका मिळू शकते. बॉडी डिटॉक्सबाबत आपण नक्कीच ऐकलं असेल, तसंच हेअर डिटॉक्स हे केसांसाठी खूप महत्वाचं ठरतं. यामुळे कोंडा, टाळूची खाज कमी होते आणि केसांची हरवलेली चमक पुन्हा मिळते.

हेअर डिटॉक्स कसा करावा?

आयुर्वेदिक पद्धतीनं केलेला हेअर डिटॉक्स हा फक्त केसांची केवळ वरवर नाही तर समस्येच्या मुळावर काम करून नेहमीसाठी उपाय देतो. जर टाळू खूप तेलकट असेल, हिवाळ्यात कोंडा वाढत असेल आणि केस गळण्याची समस्या जाणवत असेल, तर केवळ ४ आठवड्यांत या सर्व समस्या नियंत्रण मिळवता येतात. आता जाणून घेऊया, हे कसं करायचं.

पहिला आठवडा – शुद्धिकरण

पहिल्या आठवड्यात केसांचे शुद्धिकरण करा. यासाठी आठवड्यातून दोन वेळा कडूलिंबाच्या आणि लिंबाच्या तेलाने केसांची चांगली मालिश करा. तेल हलकं कोमट असणं आवश्यक आहे. त्यानंतर केमिकल शाम्पूऐवजी रीठा–शिकेकाई पावडर भिजवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट काही वेळ केसांवर लावून ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे केस आतून स्वच्छ होतात आणि हे नैसर्गिक क्लिंझरप्रमाणे काम करते.

दुसरा आठवडा – पोषण

दुसऱ्या आठवड्यात केसांना पोषण द्या. यासाठी आठवड्यातून एकदा अ‍ॅलोवेरा जेल आणि दही मिसळून केसांवर लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ व चमकदार होतात. यासोबतच आहारातही बदल करा. फार तिखट, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर टाळा. शक्य तितक्या हिरव्या भाज्या आहारात समाविष्ट करा.

तिसरा आठवडा – मजबुती

तिसऱ्या आठवड्यात केस मजबूत करण्यावर भर द्या. यासाठी भृंगराज तेलाने नियमित मालिश करा. भृंगराज तेल केस गळती कमी करण्यासोबतच नवीन केस उगवण्यासही मदत करतं. याशिवाय, मेथीदाणे रात्रभर भिजवून त्याची पेस्ट करून ती खोबऱ्याच्या तेलासोबत लावल्यास केस अधिक दाट आणि मजबूत होतात.

चौथा आठवडा – काळजी

चौथ्या आठवड्यात केसांची काळजी घ्या. यासाठी जास्वंदाच्या फुलांचा कंडिशनर तयार करू शकता. जास्वंदाची फुले पाण्यात उकळा आणि ते पाणी गार झाल्यावर केस धुवा. हे नैसर्गिक कंडिशनरसारखं काम करतं आणि केसांना मऊ व चमकदार बनवतं.

Web Title : हेयर डिटॉक्स: चार हफ़्तों में रूसी और खुजली कम करें

Web Summary : हेयर डिटॉक्स रूसी और बालों के झड़ने जैसी समस्याओं का समाधान चार सप्ताह की आयुर्वेदिक दिनचर्या से करता है। इसमें नीम और रीठा से सफाई, एलोवेरा से पोषण, भृंगराज से मजबूती और गुड़हल से कंडीशनिंग शामिल है, जिससे बाल स्वस्थ और चमकदार होते हैं।

Web Title : Hair Detox: Reduce Dandruff and Itchiness in Four Weeks

Web Summary : Hair detox addresses issues like dandruff and hair fall through a four-week Ayurvedic routine. It involves cleansing with neem and reetha, nourishing with aloe vera, strengthening with bhringraj, and conditioning with hibiscus for healthy, shiny hair.