Join us

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले? तज्ज्ञ सांगतात, करा फक्त ८ गोष्टी, केस राहतील काळेभोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 13:17 IST

How To Delay Premature Graying of Hairs : केस पांढरे होऊ नयेत किंवा झालेले वाढू नयेत यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी

ठळक मुद्देकमी वयात केस पांढरे झाले असतील तर करा हे सोपे उपाय...आहारातील सोपे बदल सौंदर्यासाठीही फायदेशीर असतात

आपलं वय कधीच वाढू नये असं प्रत्येकाला वाटत. मात्र ते वाढतं आणि वयाच्या खुणा हळूहळू दिसायला लागतात. वय झालं की चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, हाडे ठणकणे, थकवा येणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस पांढरे होणे या समस्या उद्भवतात. वय झाल्यावर केस पांढरे होणे ठिक आहे. पण हल्ली कमी वयातच केस पांढरे व्हायला लागतात. एकदा केस पांढरे झाले की कमी वयातच आपण वयस्कर झालो याचं आपल्याला टेन्शन यायला लागतं. मग कधी मेहेंदी लावून हे पांढरे केस लपवावे लागतात तर कधी कलर करुन. केस पांढरे होऊ नयेत किंवा झालेले वाढू नयेत यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात, त्या कोणत्या पाहूया (How To Delay Premature Graying of Hairs)...

१. रीठा आणि शिकेकाई पाण्यात भिजवून ते उकळा आणि शाम्पू म्हणून त्याचा वापर करा. 

२. १० ते १२ आवळे वापरुन ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ते पाणी केसांना कंडीशनर म्हणून वापरा. 

३. ताण कमी करण्यासाठी होमिओपॅथिक उपचारांची मदत घ्या. केस पांढरे होण्यामागे ताण हे एक महत्त्वाचे कारण असते. केस पांढरे होऊ नयेत म्हणूनही होमिओपॅथीचे उपचार फायदेशीर ठरतात. 

४. आहारात भाज्या, फळे आणि सुकामेवा यांच्या माध्यमातून अँटीऑक्सिडंटसचा समावेश ठेवा. तसेच व्हिटॅमिन इ, सेलेनियम, झिंक, फोलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी यांचा समावेश ठेवल्यास केस पांढरे होण्याची समस्या कमी होईल.

५. मोड आलेली कडधान्ये, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ यांमुळे केस नैसर्गिकरित्या चमकदार राहण्यास मदत होईल. तसेच केसांचा पोत सुधारण्यासही याचा चांगला उपयोग होईल. 

 

 

६. हिरव्या पालेभाज्या, केशरी आणि पिवळ्या रंगाची फळे यांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. या गोष्टींचा आहारात समावेश ठेवा. 

७. रंग किंवा प्रिझर्व्हेटीव्ह घातलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परीणाम होतो आणि केस आणि डोक्याची त्वचा रुक्ष होते. 

८. आपल्या केसांना सूट होतील अशा उत्पादनांची निवड करावी. कारण जास्त उग्र केमिकल्स असलेल्या उत्पादनांमुळे केसांचा पोत जास्त खराब होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीआहार योजना