Join us

ओठ फुटतात कारण ‘या’ दोन व्हिटामिन्सची कमतरता, ५ पदार्थ खा- ओठ होतील मऊ गुलाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 16:07 IST

vitamins for lips : cracked lips solution: dark lips home remedy: foods for pink lips: जाणून घेऊया ओठ फाटण्याची लक्षणे कोणती, यावर मात कशी करता येईल.

ओठांमुळे आपलं सौंदर्य अधिक वाढतं. ओठ आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव आहे.(Lips Care Tips) आपल्या सौंदर्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग ओठ आहेत. ऋतू कोणताही असला तरी ओठ फुटण्याची किंवा काळे पडण्याची समस्या अधिक होते.(cracked lips solution) ओठ वारंवार फुटतात, कोपऱ्यांतून कडा फाटतात किंवा सतत कोरडे आणि निर्जीव वाटू लागतात तेव्हा फक्त वातावरणच नाही तर आपल्या काही चुकीच्या सवयी देखील असू शकतात. (dark lips home remedy)दिवसातून अनेक वेळा आपण ओठांसाठी लिप बाम किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करतो पण तरी देखील ओठांची समस्या कायम राहते.(foods for pink lips) ओठ फाटण्याची समस्या ही फक्त वातावरणच नाही तर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील होते.(vitamins for lips) जर आपले ओठ वारंवार फाटत असतील तर हे जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते. जाणून घेऊया ओठ फाटण्याची लक्षणे कोणती, यावर मात कशी करता येईल.(lip care tips naturally) 

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स- निस्तेजही दिसतो? बेसनाच्या पिठात कालवून १ पदार्थ लावा, आठवड्याभरात चेहऱ्यावर येईल ग्लो

ओठ फाटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, बदलणारे हवामान, ओठांनी जिभेला सतत ओले करणे, सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन, पोषक तत्वांची कमतरता, औषधांचा दुष्परिणामांमुळे असं होतं. 

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ओठ फाटतात? 

फाटलेले ओठ आपली रोजची समस्या असेल तर शरीरात व्हिटॅमिन बी १२ किंवा बी २ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. व्हिटॅमिन बी २ (रिबोफ्लेविन) च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि रखरखीत होऊ शकते. ओठांवर भेगा पडू शकतात आणि जखमा तयार होऊ शकतात. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे ओठांवर जळजळ जाणवू लागते. ओठ कोपऱ्यातून कट होतात, त्वचा आणि केसांची स्थिती बिघडू लागते. थकवा, चिडचिड आणि झोपेच्या समस्या देखील वाढतात. 

ओठांची काळजी कशी घ्याल? 

व्हिटॅमिन बी १२ आणि बी २ ची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यासाठी दही, पनीर, चीज किंवा अंडी, मासे यांचा समावेश करा. तसेच हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, बीन्स आणि सोया उत्पादने खा. इतकेच नाही तर दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा ओठांना स्क्रब करा. ऑरगॅनिक लिप बाम वापरा. याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी