Join us

केस पिकलेत? काळ्या बियांचा १ उपाय करा, सतत डाय करावं लागणार नाही-काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 22:19 IST

How To Color My White Hair Black : भाजलेल्या कलौंजीचा वापर करून केसांची वाढ  करू शकता. हा उपाय अनेकांसाठी फायदेशीर ठरतो.

आजकाल केस पांढरे होणं हे खूपच सामान्य झालं आहे.  शाळेतील किंवा कॉलेजच्या मुलींचे केसही पांढरे होतात. फक्त केमिकल्सचा वापर करणं यावर उपाय नाही. काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही काळेभोर, दाट केस मिळवू शकता. भाजलेल्या कलौंजीचा वापर करून केसांची वाढ  करू शकता. हा उपाय अनेकांसाठी फायदेशीर ठरतो. (How To Colour My White Hair Black With roasted Kalonji Remedy)

केसांसाठी कलौंजीचे फायदे

काळ्या रंगाच्या कलौंजीच्या बियांचा जास्त  वापर करायला हवा. यात मोठ्या प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स, ओमेगा-३, ओमेगा-६ फॅटी एसिड्स, व्हिटामीन ए यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे केस वाढण्यासोबतच केस मजबूत राहण्यासही मदत होते. अनेकजण केसांना हेल्दी ठेवण्यासाठी कलौंजीच्या तेलाचा वापर करतात.  या तेलानं केस काळे होण्यास मदत होते. 

कलौंजीचा हेअर  कलर कसा तयार करावा?

१) कलौंजी- २ चमचे

२) आवळा पावडर - २ चमचे 

३) भृंगराज- १ चमचे

४) दही- ४ चमचे

सगळ्यात आधी एक पॅन घ्या. त्यात २ चमचे कलौंजी घालून व्यवस्थित भाजून घ्या. नंतर भाजलेली कलौंजी मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या आणि पावडर तयार करा. तयार पावडर एका वाटीत घाला त्यात 2 चमचे आवळा पावडर 2 चमचे भृंगराज पावडर, 4 चमचे दही घालून व्यवस्थित मिक्स करून  घ्या. तयार पेस्ट केसांना  लावून 30 ते 45 मिनिटं लावून सुकू द्या.  नंतर हेअर वॉश करा ज्यामुळे केस काळेभोर होते. हा उपाय केल्यानं केस काळेभोर होण्यास मदत होईल. हा उपाय करून तुम्ही हेल्थ सुधारू शकता. 

केसांसाठी आवळा फायदेशीर ठरतो. याच कारणामुळे अनेक केसांच्या उत्पादनांमध्ये आवळ्याचा वापर केला जातो. तुम्ही आवळा खाऊन किंवा केसांवर लावूनही अनेक फायदे मिळवू शकता. ज्यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत. हेअर ग्रोथ बुस्ट होते आणि केस मजबूत होतात.

केसांसाठी वरदान आहे भृंगराज

जर तुम्हाला  वेगानं केस  वाढवायचे असतील तर भृंगराजचा वापर करू शकता. ज्यामुळे केस काळे होतात. केस तुटणं, गळणं कमी होतं, केसांची मुळं मजबूत होतात. तुम्ही भृंगराज पावडरच्या मदतीनं हेअर मास्कही बनवू शकता. ज्यामुळे स्काल्पची साफ-सफाई होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी