सध्या मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे दिवसभर मुलांचा घरात धुडगूस सुरू असतो. सुट्ट्या असल्याने काही जणं मैदानावर, गच्चीवर, अंगणातही मनसोक्त खेळतात. खेळताना मुलांना कसलेही भान राहात नाही. त्यामुळे मग बसता उठता गुडघे वारंवार जमिनीवर धुळीत टेकवले जातात आणि मग ते घाण होतात. बहुतांश लहान मुलांचे गुडघे मळ साचून साचून काळवंडून गेलेले असतात (how to reduce blackness on knees?). ते स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून बघू शकता (How To Clean Tanning On Knees?). आठवड्यातून एकदा तरी या पद्धतीने गुडघ्यांची स्वच्छता होणं गरजेचं आहे.(simple home remedies for cleaning knees of kids)
काळवंडून गेलेले गुडघे कसे स्वच्छ करावे?
१. बेसन आणि दही
बेसन किंवा हरबरा डाळीचे पीठ अंगावरचे टॅनिंग कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. गुडघे स्वच्छ करण्यासाठीही त्याचा खूप चांगला उपयोग करता येतो. यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे बेसन पीठ घ्या. त्यामध्ये १ टीस्पून हळद, १ टीस्पून दही घाला.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ५ फळं खाणं धोक्याचं, रक्तातील साखर वाढून तब्येत बिघडण्याचा धोका
कच्चं दूध घालून पीठ थोडं घट्ट कालवून घ्या. यानंतर हा लेप गुडघ्यांना लावा आणि त्याठिकाणी थोडे चोळा. नंतर ५ ते ७ मिनिटे लेप गुडघ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर पुन्हा चाेळून लेप काढून टाका आणि गुडघा स्वच्छ धुवून घ्या. काळेपणा बराच कमी झालेला असेल.
२. कॉफी आणि साखर
गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी हा उपायही अतिशय उत्तम आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा काॅफी पावडर, १ चमचा पिठी साखर घ्या.
जॅकी श्रॉफ सांगतो तशा रांगड्या पद्धतीने करा कांदा- भेंडी! चवदार भाजीची एकदम सोपी रेसिपी
त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि मध घाला. आता हा लेप गुडघ्यांना लावून ७ ते ८ मिनिटे हलक्या हाताने स्क्रबिंग करा. यामुळे त्वचेवरची सगळी घाण, डेड स्किन निघून जाईल आणि गुडघे अगदी स्वच्छ होतील. गुडघे, पायाचे घोटे, हाताचे कोपरे स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून एकदा करायलाच हवा.