आजकाल प्रत्येकाच्याच घरी फ्रिज असतो. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार डबल डोअर किंवा सिंगल डोअरचा फ्रिज खरेदी करतो. फक्त उन्हाळ्यातच नाही तर सर्व ऋतूत फ्रिजची आवश्यकता असते. बरेचदा लोक फ्रिजची साफसफाई रेग्युलर करत नाही. ज्यामुळे फ्रिजरच्या या दरवाज्यावरील रबरांवर काळा थर तयार होतो. (How To Clean Fridge Door Rubbers)
फ्रिजच्या दरवाज्यांना लावलेले रबर वेळीच साफ केले नाही तर यात टेक्निकली बिघाड होऊ शकतं. फक्त पाण्यानं हे रबर स्वच्छ होत नाहीत. यासाठी तुम्हाला मार्केटमधून कोणतंही क्लिनिंग लिक्विड आणण्याची आवश्यकता नाही. काही पदार्थ वापरून तुम्ही रबर स्वच्छ करू शकता. (How To Clean Fridge Door Rubbers Easily)
बेकींग सोडा आणि लिंबाचा रस
सिल कंपनीच्या रिपोर्टनुसार फ्रिजरच्या दरवाज्याचे रबर खराब झाले असेल तर बेकींग सोडा वापरून साफ करू शकता. यासाठी २ चमचे बेकींग सोडा आवश्यकतेनुसार लिंबाचा रस मिसळा. नंतर ही पेस्ट फ्रिजच्या दरवाज्यांच्या रबरवर व्यवस्थित लावा. ५ मिनिटं तसंच सोडून द्या. नंतर कपडे आणि ब्रशनं साफ करा. या उपायानं सर्व काळे डाग, चिकटपणा १० मिनिटांत निघून जाईल. (Ref)
टुथपेस्ट
टुथपेस्ट वापरून तुम्ही फ्रिजच्या दरवाज्याला लागलेली घाण स्वच्छ करू शकतात. टुथपेस्ट लावल्यास न घासता न रगडता फ्रिजचे दरवाजे स्वच्छ करता येतील आणि काळे डाग निघून जातील.
व्हिनेगर
तुम्ही व्हिनेगरच्या मदतीनं फ्रिजच्या दरवाज्याला लावलेलं रबर स्वच्छ करू शकता. त्यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात पाच ते ६ थेंब व्हिनेगर घाला. नंतर हे द्रावण स्प्रे बॉटलध्ये भरा नंतर कापडानं व्यवस्थित पुसून घ्या. हा उपाय करून तुम्ही फ्रिज व्यवस्थित स्वच्छ करू शकता. व्हिनेगरचा घाणेरडा वास, बॅक्टेरियाज काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो.
डिटर्जेंट
फ्रिजच्या दरवाज्याचं हे गॅस्केट साफ करणं गरजेचं आहे कारण यावर घाण, दुर्गंध जमा होतो. हे साफ करण्यासाठी माईल्ड साबण, डिटर्जेंट पावडर किंवा कोमट पाणी वापरू सकता. एका वाटीत कोमट पाणी घ्या. यात थोडा डिशवॉश लिक्विड मिसळा. एक मऊ कापड किंवा स्पंज ओला करून हळूहळू फ्रिज साफ करा. हे रबर जोरात रगडल्यानं खराब होऊ शकतं.
