Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पायावर काळे घट्टे पडले? 'अशी’ लावा टुथपेस्ट- फक्त १० मिनिटांत मिळेल पेडिक्युअरसारखा इफेक्ट

पायावर काळे घट्टे पडले? 'अशी’ लावा टुथपेस्ट- फक्त १० मिनिटांत मिळेल पेडिक्युअरसारखा इफेक्ट

How to Clean Feet Using Toothpaste?: दात स्वच्छ करण्यासाठी जसं टुथपेस्ट उपयुक्त ठरतं, तसंच ते तुमच्या पायावरचा काळेपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं...(how to get pedicure like effect at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 16:12 IST2026-02-09T16:11:41+5:302026-02-09T16:12:51+5:30

How to Clean Feet Using Toothpaste?: दात स्वच्छ करण्यासाठी जसं टुथपेस्ट उपयुक्त ठरतं, तसंच ते तुमच्या पायावरचा काळेपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं...(how to get pedicure like effect at home?)

how to clean feet using toothpaste, how to do pedicure at home, home hacks to do pedicure at home, how to get pedicure like effect at home  | पायावर काळे घट्टे पडले? 'अशी’ लावा टुथपेस्ट- फक्त १० मिनिटांत मिळेल पेडिक्युअरसारखा इफेक्ट

पायावर काळे घट्टे पडले? 'अशी’ लावा टुथपेस्ट- फक्त १० मिनिटांत मिळेल पेडिक्युअरसारखा इफेक्ट

Highlightsपायावरचा काळपटपणा काढून टाकायचा असेल तर तुमच्या घरातलं टुथपेस्ट एका खास पद्धतीने वापरून पाहा.

आपल्या शरीराचा एक दुर्लक्षित भाग म्हणजे आपले पाय. खरंतर पाय सगळ्यात जास्त घाण होत असतात. पायांवर खूप घाण, किटाणू जमा होत असतात. पण बाहेरून आल्यानंतर पायावर पाणी घेऊन पाय धुणे याच्यावर आपण त्यांची जास्त काळजी घेत नाही. आंघोळीच्या वेळीही पायांना नियमितपणे साबण लावून स्वच्छ करणं होतच असं नाही. त्यामुळे मग पाय काळे पडतात. काही जणांच्या पायावर तर काळपट घट्टे तयार होतात (home hacks to do pedicure at home). असे अस्वच्छ पाय अजिबातच चांगले वाटत नाहीत. म्हणूनच पायावरचा काळपटपणा काढून टाकायचा असेल तर तुमच्या घरातलं टुथपेस्ट एका खास पद्धतीने वापरून पाहा.(how to get pedicure like effect at home?)

टुथपेस्टचा वापर करून घरच्याघरी कसं पेडिक्युअर करावं?

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरगुती पदार्थच वापरायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी कपडे धुण्याची साबण किसून घ्या. साधारण १ चमचा साबणाचा किस एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा टुथपेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला.

केसांना डाय किंवा मेहेंदीची कधी गरजच पडणार नाही, मोहरीचं तेल 'असं' लावा- केस नॅचरली काळे होतील

आता हे तिन्ही पदार्थ एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा तेल आणि १ चमचा दही घाला. आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

 

यानंतर तुमचे पाय थोडे ओलसर करा. त्या पायांवर तयार केलेला लेप लावा. त्यानंतर २ ते ३ मिनिटे हातांनी पाय स्वच्छ चोळून घ्या आणि त्यानंतर गरम पाण्याने धुवून टाका. तुम्हाला पायांचा काळेपणा बऱ्यापैकी कमी झालेला जाणवेल. आता टाचा जर खूप भेगाळलेल्या असतील तर गरम पाणी करा.

बापरेऽऽऽ! कानातच झाला इअर फोनचा स्फोट, ‘या’ ३ गाेष्टी टाळा नाहीतर कान गेलाच समजा

त्यात ३ ते ४ चमचे मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. पाणी कोमट होईपर्यंत पाय त्यामध्येच बुडवून ठेवा. यानंतर स्क्रबर किंवा दगड घेऊन टाचा घासा. डेडस्किन निघून जाईल आणि टाचाही अगदी स्वच्छ होतील. 

 

Web Title : पैरों पर काले धब्बे? पेडिक्योर जैसा असर पाने के लिए टूथपेस्ट का इस्तेमाल करें!

Web Summary : पैरों की देखभाल की अनदेखी से काले धब्बे हो जाते हैं। इस घरेलू उपाय में टूथपेस्ट, साबुन, नींबू, कॉफी, तेल और दही का उपयोग किया जाता है। पेस्ट लगाएं, स्क्रब करें और धो लें। नमक और बेकिंग सोडा के साथ गर्म पानी में पैर भिगोएं, फिर साफ, चिकने पैरों के लिए एड़ी को स्क्रब करें।

Web Title : Dark Patches on Feet? Use Toothpaste for Pedicure-Like Effect!

Web Summary : Neglecting foot care leads to dark patches. This home remedy uses toothpaste, soap, lemon, coffee, oil, and yogurt. Apply the paste, scrub, and rinse. Soak feet in warm water with salt and baking soda, then scrub heels for clean, smooth feet.