Join us

पायाचे घोटे काळवंडून घट्टे पडले? १ सोपा उपाय- टॅनिंग, डेडस्किन जाऊन पाय स्वच्छ होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 12:17 IST

How To Remove Tanning And Dead skin From Ankle: तळपायाचे घोटे काळवंडून गेले असतील तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा.(How To Get Rid Of Dark Ankles?)

ठळक मुद्देपाय खूप जास्त काळे पडले असतील तर आठवड्यातून दोन वेळा हा उपाय नियमितपणे करा.

बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की तळपायाचे घोटे खूप काळवंडून जातात. याचं एक कारण म्हणजे आपण जेव्हा मांडी घालून बसतो, तेव्हा पायाचे घोटे जमिनीला टेकले जातात. शरीराचा दाब त्या घोट्यांवर येतो आणि त्यांचे वारंवार जमिनीशी घर्षण होते. त्यामुळे मग तो भाग काळा पडत जातो. आंघोळ करताना आपण शरीराची स्वच्छता करतो पण तळपायाच्या घोट्यांकडे मात्र दुर्लक्षच होतं. त्यामुळे मग घोट्यांवरचा काळेपणा वाढत जातो. तिथली डेडस्किन आणि टॅनिंग वाढून त्याठिकाणी काळे घट्टे पडल्यासारखे होते. ते नंतर अतिशय वाईट, अस्वच्छ दिसतं (How To Get Rid Of Dark Ankles?). म्हणूनच हा एक उपाय करून पाहा (How To Remove Tanning And Dead skin From Ankle?). पायाचे घोटे स्वच्छ होतील.(home hacks for cleaning ankles)

 

पायाचे काळवंडलेले घोटे कसे स्वच्छ करावे?

पायाचे काळवंडलेले घोटे स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी पाय गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये थोडा वेळ भिजवत ठेवा. यामुळे घोट्यावरची त्वचा थोडी मऊ पडेल.

'ही' पॅरेण्टिंग स्टाईल आहे एकदम बेस्ट! मुलं गुणी, समजूतदार होऊन अभ्यासात हुशार होतील..

यानंतर प्युमिक स्टोन पायाच्या घोट्यावर घासा. गरम पाण्यामुळे त्वचा मऊ पडलेली असते. ती प्युमिक स्टोनने घासल्याने लवकर निघायला मदत होते. पण मात्र खूप जोरजोरात घासू नये. यानंतर पाय पुन्हा धुवून घ्या.

 

यानंतर एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा तांदळाचे पीठ एकत्र करा. त्यात मध घाला आणि हा लेप तळपायाच्या घोट्यावर लावा. ५ ते ७ मिनिटे तो तसाच पायावर ठेवा. लेप अर्धवट सुकल्यानंतर हाताने चोळून तो काढून टाका. यामुळे डेडस्किन, टॅनिंग बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. 

श्रावणी सोमवार विशेष रांगोळी डिझाईन्स! फ्लॅटसमाेरच्या छोट्या जागेतही काढता येईल सुंदर रांगोळी

पाय खूप जास्त काळे पडले असतील तर आठवड्यातून दोन वेळा हा उपाय नियमितपणे करा. काही दिवसांतच पायाचा घोटा स्वच्छ दिसू लागेल. हाताचे कोपरे, मान, गुडघे स्वच्छ करण्यासाठीही हा उपाय चांगला आहे.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी