Lokmat Sakhi >Beauty > RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस

RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस

Post-Holi Hair Care Tips: How to Repair Hair After Holi: Holi Hair Damage Solutions: Frizzy Hair Remedies After Holi: Dry Hair Treatment After Holi Colors: रंग खेळल्यानंतर कोरड्या केसांना पुन्हा मऊ कसे करायचे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 18:48 IST2025-03-13T17:03:03+5:302025-03-13T18:48:28+5:30

Post-Holi Hair Care Tips: How to Repair Hair After Holi: Holi Hair Damage Solutions: Frizzy Hair Remedies After Holi: Dry Hair Treatment After Holi Colors: रंग खेळल्यानंतर कोरड्या केसांना पुन्हा मऊ कसे करायचे पाहूया.

how to care hair after holi follow this simple 5 tips frizzy and dry hair | RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस

RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस

होळीचा सण हा रंगांचा आणि आनंदाने भरलेला असतो. त्वचेचे आणि केसांच या काळात अधिक नुकसान होऊ नये म्हणून हर्बल रंगाचा वापर करतो.(Hair Care Tips for Holi Damage) परंतु, आपल्याला रंग लावणाऱ्या व्यक्तीकडे कोणता रंग असेल माहित नाही.(Restore Frizzy Hair Post-Holi) केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होते. रंग खेळण्यापूर्वी किती चेहऱ्याची आणि केसांची काळजी घेतली तरी त्वचा-केस खराब होतात. सध्या केसगळती, कोरड्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (Moisturizing Dry Hair After Holi)
केस धुतल्यानंतरही होळीचे रंग केसांमध्ये बराच काळ राहतात. या रंगांमुळे केस कोरडे, निस्तेज आणि कुरळे होतात.(Best Hair Masks After Holi) रंग खेळण्यापूर्वी आपण केसांची काळजी घेतो परंतु, रंग खेळल्यानंतर कोरड्या केसांना पुन्हा मऊ कसे करायचे पाहूया. या ५ सोप्या टिप्सने केस होतील मऊ आणि चमकदार 

उन्हाळ्यात त्वचा सतत तेलकट-कोरडी होते; दिवसातून चेहरा किती वेळा धुवायला हवा? चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती?

1. शाम्पूने केस धुवा

होळीचे रंग काढून टाकण्यासाठी सर्वप्रथम केस चांगले धुवावेत. यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. जो आपल्या केसांना हानी पोहोचवणार नाही. केसांना जास्त घासू नका. हलक्या हाताने शाम्पू लावून केस धुवा. यामुळे केसांचा रंग आणि घाण दोन्ही निघून जाईल. केसांमध्ये असलेले नैसर्गिक तेल टिकून राहिल. 

2. केसांना तेल लावा


केसात रंग अडकल्यानंतर त्यांचा ओलावा कमी होतो. ज्यामुळे केस कोरडे होतात. केसांना तेल लावणे खूप फायदेशीर आहे. नारळाचे तेल, आवळा तेल किंवा ऑलिव्ह तेल आपण वापरु शकता. केसांच्या मुळांना आणि टोकांना हलक्या हाताने तेल लावा. तेलाने मालिश केल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. १ ते २ तासांनी केस शाम्पूने धुवा. 

3. गरम तेलाने मालिश करा 

केसांना पुन्हा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी गरम तेलाने मालिश करण्याचा उत्तम मार्ग आहे. केसांच्या मुळांना आणि लांबीला कोमट तेल लावा. काही वेळ तसेच राहू द्या. गरम तेलाच्या मालिशमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. रंगांमुळे केसांचे नुकसान कमी होते. 

4. हेअर मास्कचा वापर 

आपल्या केसांना पोषण देण्यासाठी आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हेअर मास्कचा वापर करा. यासाठी दही, मध, आवळा, कोरफड जेल यांसारखे नैसर्गिक पदार्थ मिसळून हेअर मास्क बनवा. हे हेअर मास्क केसांना खोलवार ओलावा देते. हा हेअर मास्क केसांवर १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि सौम्य शाम्पूने धुवा. 

5. कंडिशनर लावा

होळी खेळल्यानंतर केसांना चांगले कंडिशनर लावणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील. कंडिशनर केसांना पोषण देतो. रंगांमुळे केसांचे नुकसान भरुन काढण्यासाठी कंडिशनर केसांना लावा आणि २ ते ३ मिनिटे राहू द्या. केस चांगले धुवून कोरडे करा. 
 

Web Title: how to care hair after holi follow this simple 5 tips frizzy and dry hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.