आपल्या त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी नियमित त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. सध्याच्या काळात प्रदूषण, धूळ- माती, सतत उन्हात वापरल्याने याचा थेट (5 Minute Hand Feet Bleach At Home) परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो. यामुळे ठराविक एका कालांतराने आपली त्वचा त्वचा काळसर आणि निस्तेज दिसू लागते. विशेषतः हातपायांवर सर्वाधिक प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि घामाचा परिणाम होतो. यामुळे त्वचेचा निसर्गिक रंग बदलून काळसर होतो. यासाठी, अशा त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्वेचेचा नैसर्गिक रंग पुन्हा येण्यासाठी आपल्यापैकी काहीजणी त्वचेला ब्लीच (Get salon-quality Bleach results at home) करतात. त्वचेचे ब्लिचिंग करून त्वेचचा हरवलेला नैसर्गिक रंग (How to Bleach Your Skin At Home Without Damaging It) आपल्याला अगदी सहजपणे पुन्हा आणता येऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त ब्लिचिंग प्रॉडक्ट्स तात्पुरते परिणाम देतात, याचबरोबर त्वचेसाठी याच्या दीर्घकालीन वापरामुळे त्वचेवर साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय निवडणे केव्हाही अधिक उत्तमच(How To Bleach Skin Like A Pro At Home).
त्वचेसाठी केमिकल्सयुक्त ब्लिचिंग प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपण घरगुती नैसर्गिक ब्लिचचा वापर करू शकतो. यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने आपण अगदी झटपट नैसर्गिक आणि त्वचेसाठी उपयुक्त असे ब्लिच तयार करु शकतो. या घरगुती, नैसर्गिक ब्लिचच्या मदतीने त्वचेला कोणतीही हानी न पोहोचता सौम्य पद्धतीने त्वचेचा रंग उजळवता येतो. घरच्याघरीच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने झटपट ब्लिच कसे तयार करायचे आणि हातापायांची त्वचा उजळ करण्यासाठी याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.
साहित्य :-
१. कॉफी पावडर - १ टेबलस्पून
२. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून
३. खोबरेल तेल - १ टेबलस्पून
४. शाम्पू - १ टेबलस्पून
५. लिंबाचा रस - १ ते २ टेबलस्पून
वाटीभर दह्यात मिसळा चमचाभर 'हा' पदार्थ - केसगळती थांबून केस वाढतील जोमाने - हमखास भारी उपाय...
कृती :-
सगळ्यांतआधी एका बाऊलमध्ये कॉफी पावडर, बेकिंग सोडा, खोबरेल तेल, शाम्पू, लिंबाचा रस असे सगळे जिन्नस एकत्रित घ्यावेत. हे सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण चमच्याने कालवताना हळूहळू मिश्रण फुलून त्याचा फेस तयार होऊ लागेल. मिश्रण थोडे फेसाळते झाल्यावर आपले ब्लिच त्वचेला लावण्यासाठी तयार झाले आहे असे समजावे.
अमोनियायुक्त हेअर कलर्सना म्हणा नाही! मेथी दाणे, हळद, अळशीचा नॅचरल हेअर कलर - केस दिसतील काळेभोर...
या ब्लिचचा वापर त्वचेसाठी कसा करावा ?
सगळ्यातआधी हे तयार ब्लिच हातापायांच्या त्वचेवर लावून घ्यावे. त्यानंतर हे ब्लिच त्वचेवर तसेच २ ते ३ मिनिटे राहू दयावे. २ मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून त्वचेचे स्क्रबिंग करून घ्यावे. त्यानंतर लिंबाच्या साली घेऊन त्या थेट पायांवर चोळून स्क्रबिंग करावे. स्क्रबिंग झाल्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. पाय पुसून कोरडे करून खोबरेल तेलाचे काही थेंब घेऊन ते पायांवर मॉइश्चरायझर म्हणून लावून चोळून घ्यावे. हा उपाय आठवड्यातून २ वेळा महिनाभर केल्यास हातापायांची काळवंडलेल्या त्वचेचा रंग बदलून त्वचा उजळ दिसू लागते. हा नैसर्गिक उपाय त्वचेला पोषण देण्यासोबतच त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदारपणा आणण्यास मदत करेल. जेव्हा तुम्हाला पार्टी, फंक्शन किंवा लग्नकार्याला जायचे असेल आणि पार्लरसाठी वेळ किंवा बजेट नसेल तेव्हा हातापायांना ब्लिचिंग करण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा.