Join us

पांढरे केस कमीच होत नाहीत? चमचाभर कलौंजीचा १ उपाय करा, लगेच काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:46 IST

How To Blacken White Hairs Using Kalonji : सगळ्यात आधी एक कप कलौंजी कोणत्याही काचेच्या भांड्यात रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा.

केस पांढरे (Grey Hairs) होण्याच्या समस्येनं बरेच लोक त्रस्त असतात. कमी वयात केसांवर हेअर डाय किंवा मेहेंदीचा वापर केल्यास केसांचा नैसर्गिक काळेपणा कमी होतो (How To Blacken White Hairs Using Kalonji). हेअर कलर निघून गेल्यानंतर केस खराब दिसतात.  घरी बनवलेलं हेअर ऑईल केसांना लावून तुम्ही लांबसडक, दाट केस बनवू शकता.  ज्यामुळे  केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग येईल आणि केस नैसर्गिकरित्या काळे होतील. (Kalonji For Black Hairs Solution)

सगळ्यात आधी एक कप कलौंजी कोणत्याही काचेच्या भांड्यात रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा.  नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यासोबत कलौंजीची पेस्ट बनवून घ्या.  एका लोखंडाच्या कढईत ही पेस्ट आणि मोहोरीचे २ कप तेल घालून शिजवून घ्या. अर्ध शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि थंड होऊ द्या. (How To Blacken White Hairs Using Kalonji)

कोणत्याही एका कापडात व्यवस्थित कलौंजी गाळून घ्या. नंतर काचेच्या तेलाच्या  बरणीत भरून घ्या. तयार आहे केसांना नैसर्गिकरित्या काळे करणारे तेल. केसांना काळे  करणारे हे तेल लावून रात्रभर तसंच ठेवा.  नंतर शॅम्पूनं केस धुवा. अनेक आठवडे केसांना तेल लावल्यास  केसांचा नैसर्गिक रंग दिसून येईल.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाईन्स, पाहा

केस धुण्यासाठी कलौंजीचं पाणी तयार करणं खूपच सोपं आहे. हे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि उकळवायला ठेवा. यात कलौंजीच्या बिया घालून १५ ते  २० मिनिटं उकळववून घ्या. नंतर हे पाणी थंड करायला ठेवा. या पाण्यानं  केस धुतल्यानं स्काल्पला फायदे मिळतील. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. 

एक चमचा कलौंजीचे दाणे, एक चमचा मेथीचे दाणे आणि २५० मिली लीटर नारळाचे तेल एकत्र मिसळा. नंतर हे तेल केसांना लावा.  ज्यामुळे हेअर फॉल कमी होईल.  हे तेल बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे मेथीचे दाणे आणि कलौंजीचे दाणे एकत्र वाटून पावडर बनवून घ्या. नारळाच्या तेलासोबत मिसळून ही पेस्ट केसांना लावा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स