Lokmat Sakhi >Beauty > केसात अचानक पांढरे केस चमकू लागले? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ उपाय-डायला हातही लावू नका..

केसात अचानक पांढरे केस चमकू लागले? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ उपाय-डायला हातही लावू नका..

How To Blacken Grey Hairs : पांढरे केस लपवण्यासाठी लोक हेअर डायचा वापर करतात. पण हेअर डायरमुळे केसाचं नुकसानही होऊ शकतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:17 IST2025-08-14T14:55:53+5:302025-08-14T15:17:53+5:30

How To Blacken Grey Hairs : पांढरे केस लपवण्यासाठी लोक हेअर डायचा वापर करतात. पण हेअर डायरमुळे केसाचं नुकसानही होऊ शकतं

How To Blacken Grey Hairs : How To Get Black Hairs Naturally | केसात अचानक पांढरे केस चमकू लागले? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ उपाय-डायला हातही लावू नका..

केसात अचानक पांढरे केस चमकू लागले? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ उपाय-डायला हातही लावू नका..

आजकाल कमी वयात केस काळे होण्याची समस्या मुलांपासून मुलींना तरूण वयापासूनच होते. (Hair Care Tips) यामागे हेल्थ एक्सपर्ट्स चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, स्ट्रेस, प्रदूषण, झोपेची कमतरता आणि केमिकल्सयुक्त उत्पादनांचा अति वापर ही मुख्य कारणं सांगतात. पांढरे केस लपवण्यासाठी लोक हेअर डायचा वापर करतात. पण हेअर डायरमुळे केसाचं नुकसानही होऊ शकतं. पांढऱ्या केसांना परत काळे बनवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपायांची मदत घेऊ शकता. (How To Blacken Grey Hairs)

प्रसिद्ध आयुर्वेदीक आणि युनानी एक्सपोर्ट डॉक्टर सलिम जैदी यांनी युट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी ३ सोपे, असरदार उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय केसांना नॅचरल काळा रंग मिळेल आणि केस वेळेआधी पांढरे होणार नाहीत.

या उपायात आवळा आणि ब्राम्ही पावडर योग्य प्रमाणात घेऊन एका एअरटाईट डब्ब्यात ठेवा. रोज सकाळी रिकाम्यापोटी 5 ग्रॅम मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या. आयुर्वेदीक एक्सपर्ट्स सांगतात की यामुळे पित्त दोष संतुलित राहतो. केस मुळापासून मजबूत होतात केसांना पोषण मिळते आणि केसांचा नैसर्गिक रंगही टिकून राहतो.

दुसऱ्या उपायात डॉक्टर जैदी यांनी केस धुण्यासाठी 1 हर्बल शॅम्पू बनवण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आवळा, रिठा, शिकेकाई, भृंगराज पावडर सम प्रमाणात घेवून मिसळून ठेवा . रात्री 1 टेबलस्पून पावडर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी उकळवून घ्या. त्यानंतर पाणी थंड करून गाळून घ्या नंतर या पाण्यानं केस धुवा. डॉक्टर जैदी यांच्यामते आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करा. हा नैसर्गिक शॅम्पू केसांना साफ, मुलायम बनवतो. ज्यामुळे केस नॅच्युरल पद्धतीनं काळे होतात.

केस काळे करण्यासाठी डॉक्टर जैदी यांनी एक खास तेल बनवून मसाज करण्याचा सल्ला दिला आहे. हे तेल बनवण्यासाठी 100 एमएल नारळाचं तेल 100 एमएल तिळाचं तेल एकत्र मिसळा. नंतर लोखंडाची कढई घेऊन त्यात हे तेल घाला. 1 मुठभर कढीपत्ता घालून मंद आचेवर शिजवून घ्या. पानं काळी झाल्यानंतर तेल थंड करून काचेच्या जारमध्ये भरा.

आठवड्यातून 2 ते 3 वेळा हलक्या हातानं स्काल्पची मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. हे तेल केसांच्या मुळांना मजबूत करते, केस गळणं रोखते आणि केस काळे होण्यासही मदत होते. डॉक्टर सांगतात की हे तिन्ही उपाय कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय असून तुम्हाला आतून पोषण देतील आणि नैसर्गिक रंग टिकून राहील.

Web Title: How To Blacken Grey Hairs : How To Get Black Hairs Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.