ऋतू बदलला की, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सहज दिसून येतो. कोरडी पडणारी त्वचा अचानक तेलकट होऊ लागते. (How to get glowing skin without Botox) तर कधीकधी अतिप्रमाणात पिंपल्स, त्वचेचा कोरडेपणा, टॅनिंग आणि पिग्मेंटेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेची समस्या बरी होण्याऐवजी ती अधिक प्रमाणात वाढते. (Home remedies for dark circles and pigmentation)
सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागडे प्रोडक्ट्स आणि आणि ब्युटी पार्लरमधील महागड्या स्किन केअरचा वापर करतो. (Coffee powder for pimples) त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने न निवडल्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. हल्ली त्वचा अधिक सुंदर दिसावी यासाठी बोटोक्स, हायड्रा फेशियल सारख्या अनेक गोष्टींचा वापर त्वचेसाठी केला जातो. परंतु यामुळे त्वचा तजेलदार होण्याऐवजी ती अधिकच खराब आणि निस्तेज दिसू लागते. (Natural ways to reduce dark circles at home)
उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब
त्वचा उजळवण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कंटेंट क्रिएटर रोहित सचदेवा यांनी एक सोपी ट्रिक्स सांगितली आहे. महागड्या पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा कॉफीची सोपी ट्रिक वापरली तर त्वचा उजळण्यास मदत होईल. तसेच उन्हामुळे त्वचेवर आलेले टॅनिंग दूर होईल. पिग्मेंटेशन आणि पिंपल्सच्या समस्या दूर होतील.
कॉफीचा पॅक कसा बनवाल?
कॉफी पावडर - १ चमचा
पाणी - १/२ कप
कॉर्न स्टार्च - १ चमचा
कोरफड जेल - १ चमचा
व्हिटॅमिन ई - २ कॅप्सूल
चेहऱ्यावर कॉफीचा मास्क कसा लावाल?
सगळ्यात आधी पॅन घेऊन त्यात १ चमचा कॉफी पावडर आणि पाणी घाला. ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. त्यानंतर कॉफीचे पाणी गाळून घ्या.
यामध्ये एक चमचा कॉर्न स्टार्च घाला आणि चांगले मिसळा. पॅनमध्ये कॉफीचे पाणी आणि कॉर्न स्टार्चचे मिश्रण घाला. घट्ट होईपर्यंत उकळवा.
त्याला क्रीमी रंग आल्यानंतर १ चमचा कोरफड जेल आणि २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चांगले मिसळवा. रात्री झोपण्यापूर्वी हा मास्क चेहऱ्यावर लावा.
काही दिवसात त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसू लागेल.