Join us

केसांचा झाडू झाला? चमचाभर तांदूळाचं पाणी 'असं केसांना लावा, डॉक्टर सांगतात दाट केसांचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:50 IST

How To Apply Rice Water On Hairs (kes Vadhavnayche Upay) : फर्मेंटेशनमुळे तांदूळाच्या पाण्यात लॅक्टिक एसिड तयार होते. जे स्काल्पला हेल्दी ठेवते आणि फ्रिजी केसांना मऊ बनवते.

मजबूत चमकदार केस प्रत्येकालाच हवे असतात. त्यासाठी लोक बरेच महागडे शॅम्पू, हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण या हेअर प्रोडक्ट्समधील केमिकल्स केसांच्या आरोग्यावर चुकीचा परीणाम करू शकतात. यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी काही हेअर(Rice Water For Hair Growth) टिप्स पाहूया ज्यामुळे आधीच केसांचं होणारं नुकसान टाळता येईल. यातील सगळ्यात महत्वाच घटक म्हणजे तांदळाचं पाणी. तांदळाचं पाणी त्वचेसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. केसांसाठीही तांदळाचं पाणी गुणकारी आहे. खूप कमी लोकांना माहिती असते की केसांवर तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास केसांची वाढ चांगली होते. (Rice Water For Hair Growth Advice by Doctor)

एक्सपर्ट्स काय सांगतात?

प्रसिद्ध अमेरीकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी सांगितले की योग्य पद्धतीनं फर्मेंटेड  राईस वॉटर वापरल्यास २ महिन्यात  केसांवर परीणाम दिसेल (Ref) यामुळे तुम्हाला कमालीचा परीणाम दिसून येईल. डॉक्टर सांगतात की तांदळात व्हिटामीन बी, मिनरल्स, अमिनो एसिड्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जेव्हा ४८ तास फर्मेंट केले जाते तेव्हा त्यात पिटेरा नावाचे तत्व तयार होते ज्यामुळे कोरडी त्वचा चमकदार होते.

फर्मेंटेशनमुळे तांदूळाच्या पाण्यात लॅक्टिक एसिड तयार होते. जे स्काल्पला हेल्दी ठेवते आणि फ्रिजी केसांना मऊ बनवते. यात मॅग्नेशियम, सेलेनियम असे मिनरल्स असातत ज्यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिन पोहोचवण्यास मदत होते. २ आठवडे केसांना तांदळाचं पाणी लावल्यानं केस मजबूत आणि चमकदार होतात. स्काल्पवर खाज, कोंडा होत नाही. याव्यतिरिक्त हेअर ग्रोथ होण्यासही मदत होते.

केसांवर तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करावा?

केस धुतल्यानंतर हे पाणी केसांना व्यवस्थित लावून ठेवा. २० मिनिटं केसांना तसंच लावलेलं राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्यानं केस धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. डॉक्टर बर्ग सांगतात की महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा घरगुती उपाय करायला हवेत. हे नैसर्गिक उपाय करून केसांची वाढ भराभर होण्यास मदत होईल. तांदळाचं पाणी केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरतं यामुळे स्काल्प हेल्दी राहतो आणि केस शायनी राहण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी