Lokmat Sakhi >Beauty > केस गळून गळून शेपटीसारखे झाले? जावेद हबीब सांगतात कांद्याचा खास उपाय, सुंदर-दाट केस होतील

केस गळून गळून शेपटीसारखे झाले? जावेद हबीब सांगतात कांद्याचा खास उपाय, सुंदर-दाट केस होतील

How To Apply Onion Juice On Hairs To Prevent Hair : कांद्यामुळे केस स्ट्राँग आणि मजबूत राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:25 IST2024-12-12T12:54:22+5:302024-12-12T14:25:30+5:30

How To Apply Onion Juice On Hairs To Prevent Hair : कांद्यामुळे केस स्ट्राँग आणि मजबूत राहण्यास मदत होते.

How To Apply Onion Juice On Hairs To Prevent Hair Fall Know From Jaweb Habib Avoid Smell In Hairs | केस गळून गळून शेपटीसारखे झाले? जावेद हबीब सांगतात कांद्याचा खास उपाय, सुंदर-दाट केस होतील

केस गळून गळून शेपटीसारखे झाले? जावेद हबीब सांगतात कांद्याचा खास उपाय, सुंदर-दाट केस होतील

केसांची काळजी घेण्यासाठी कांद्याचा वापर फायदेशीर मानला जातो. (Hair Care Tips) अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की, कांद्याचा रस केसांना लावल्यानं केसांना भरपूर फायदे मिळतात.  खासकरून ज्यांना हेअर फॉलची समस्या असते त्यांच्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस केसांना लावण्याचा सल्ला दिला जातो. (How To Apply Onion On Hairs To Prevent Hair Fall Know From Jawed  Habib Avoid Smell In Hairs)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार कांद्याच्या रसात सल्फर मोठ्या प्रमाणात असते. सल्फर कंटेट केसांना मजबूती देते याशिवाय केसांची लांबी वाढते. याशिवाय सल्फर कोलोजन उत्पादनही वाढवते. निरोगी केसांच्या विकासासाठी हे फार महत्वाचे असते. ज्यामुळे हेअर फॉलची समस्या टाळण्यास मदत होते. कांद्यामुळे केस स्ट्राँग आणि मजबूत राहण्यास मदत होते. हेअर लॉसची समस्या उद्भवत नाही आणि केसांचे आरोग्य चांगले राहते. इतकंच नाही तर स्किनसुद्धा चांगली राहते.

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्याासाठी पाणी किती-केव्हा प्यावं

 २००२ मध्ये झालेल्या एका अभ्यासात माहिती समोर आली होती. या अभ्यासात  लोकांच्या एका ग्रुपच्या डोक्याला कांद्याचा रस लावला होता त्याचा सकारात्मक परिणाम केसांवर दिसून आला.  महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये याचा चांगला परिणाम दिसून आला.

हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी अलिकडेच आपल्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हेअर एक्सपर्ट सांगतात की जर तुम्हाला हेअर फॉल कमी करायचा असलेल तर तुम्ही कांद्याचा रस एका बाऊलमध्ये काढून कॉटन बॉलच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास  मदत होईल.

जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी

बऱ्याच लोकांना कांद्याचा तीव्र वास सहन होत  नाही. यासाठी जावेद हबीब यांनी सोपा उपाय सांगितला आहे. हेअर एक्सपर्ट्स सांगतात की केसांना कांद्याचा रस लावण्याआधी पाण्याचा स्प्रे करा. त्यानंतर कापसाच्या मदतीने केसांची हलकी मसाज करा. त्यानंतर ५ मिनिटं  केसांना तसंच लावलेलं राहू द्या. या उपायाने तुम्हाला बरेच फायदे मिळतील.
 

Web Title: How To Apply Onion Juice On Hairs To Prevent Hair Fall Know From Jaweb Habib Avoid Smell In Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.