How to prevent hair fall with methi seeds : केसगळती ही एक मोठी गंभीर समस्या बनली आहे. जर वेळीच ही समस्या रोखली नाही तर हळूहळू डोक्यावरील केस कमी होऊन डोक्याची त्वचा दिसू लागते. अशात केसांची योग्य काळजी घेऊन आणि योग्य उपाय करून ही समस्या रोखली जाऊ शकते. यासाठी आपण किचनमधील डब्यात पडून असलेल्या खास गुणकारी बियांचा वापर करू शकता. या खास बिया म्हणजे मेथीच्या पिवळ्या बिया.
मेथी केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण यात असे तत्व असतात जे केसांच्या अनेक समस्या झटक्यात दूर करू शकतात आणि केसांची वाढही करू शकतात. मेथीमध्ये फ्लेवेनॉइड्स आढळतात, जे केसांसाठी आवश्यक असतात. तसेच मेथीमधील अॅंटी-इन्फ्लामेटरी आणि अॅंटी-फंगल गुण डोक्याची त्वचा हेल्दी राहते.
मेथी आणि दह्याचा हेअर मास्क
४ ते ५ चमचे मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी बिया गाळून घ्या आणि बारीक पेस्ट बनवा. नंतर मेथीच्या पेस्टमध्ये ४ चमचे दही मिक्स करा. हेअर पॅक तयार आहे.
कसा लावाल?
केसांना हा हेअर मास्क लावण्याआधी केस आधी शाम्पूनं चांगले धुवून घ्या. केस चांगले वाळल्यानंतर हा हेअर मास्क लावा. २ तासांनंतर केस शाम्पू आणि पाण्यानं धुवून घ्या.
मेथी आणि कोरफड
केसांच्या लांबीनुसार ४ ते ५ चमचे कोरफडीच्या गरात २ ते ३ चमचे मेथीच्या बियांची पेस्ट चांगली मिक्स ककरा. ही पेस्ट केसांना तासभर लावून ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या.
खोबऱ्याचं तेल आणि मेथी
केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात मेथीच्या बिया टाकून तेल उकडा. या तेलानं आठवड्यातून २ ते ३ वेळा मालिश करा. नक्कीच काही दिवसात फरक दिसेल.