डोळे छान टपोरे दिसावे म्हणून आपण काजळ लावतो. काजळ लावल्याशिवाय आपला लूक पुर्ण होत नाही, असं नेहमीच वाटतं. कारण आपल्या चेहऱ्याला जास्त रेखीवपणा देण्याचं काम काजळ करतं. त्यामुळे बेसिक मेकअपमध्ये ज्या काही मोजक्या गोष्टी येतात त्यामध्ये काजळ लावणं हे देखील येतं. पण बहुतांश जणींना अशी अडचण येते की काजळ लावल्यानंतर ते सुरुवातीचे अगदी काही मिनिट जशासतसं राहातं. पण नंतर मात्र ते पसरू लागतं. डोळ्यांच्या खालची बाजूही मग काळी पडू लागते. त्यामुळे मग डोळे खूपच भयानक आणि चेहरा विद्रुप दिसतो. ही अडचण तुम्हालाही येत असेल तर काजळ लावताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा..(How To Prevent Kajal From Smudging? )
डोळ्यांना लावलेलं काजळ पसरू नये म्हणून काय करावं?
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काजळ आपण थेट डोळ्यांना लावत असतो. त्यामुळे ते नेहमी चांगल्या क्वालिटीचंच घ्यायला हवं. थोडं महाग असेल तरी एकवेळ चालेल. पण काजळाच्या दर्जामध्ये मात्र तडजोड करणं डोळ्यांसाठी घातक ठरू शकतं. आता ते पसरू नये म्हणून काय करावं ते पाहूया..
१. काजळ लावण्याच्या आधी डोळ्यांच्या खालच्या भागाला थोडी कॉम्पॅक्ट पावडर लावा. त्यानंतर काजळ लावा. काजळ लावल्यानंतर पुन्हा एखाद्या मिनिटाने डोळ्याच्या खालच्या भागात अलगदपणे कॉम्पॅक्ट पावडर लावा. पण ती लावत असताना काजळ फिकं होणार नाही याची काळजी घ्या. पावडर लावल्यामुळे काजळ आहे त्या ठिकाणी लॉक होऊन जातं आणि पसरत नाही.
२. दुसरा एक उपायही तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काळ्या रंगाचं आयशॅडो, आयब्रो डिफायनर किंवा मग आय लायनर लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी काजळ लावून घ्या.
मोराच्या नथीचा नखराच देखणा.. पिकॉक नथचे बघताक्षणीच प्रेमात पडाल असे ८ सुंदर प्रकार
त्यानंतर त्याला अगदी चिटकून आयशॅडो, आयब्रो डिफायनर किंवा आय लायनर लावा. यामुळेही काजळ आहे त्या ठिकाणी पॅक होतं आणि पसरत नाही. करून पाहा. लग्नसराईमध्ये ही ट्रिक खूप उपयोगी ठरणारी आहे.
