हल्लीच्या जगात प्रेझेंटेबल दिसणं खूप गरजेचं आहे. कारण आता जेवढं महत्त्व तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञानाला आहे तेवढंच महत्त्व तुमच्या व्यक्तिमत्त्वाला देखील आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या कित्येकजणी हल्ली बेसिक मेकअप करूनच घराबाहेर जातात. कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, काजळ, आय लायनर या गोष्टी बेसिक मेकअपमध्ये येतात. आता तर अशीही पद्धत आहे की बऱ्याच जणी काजळ लावणं टाळून फक्त आय लायनर लावतात. कारण त्यामुळे डोळ्यांना खरंच खूप रेखीव लूक येतो. पण त्यासाठी तुम्हाला ते परफेक्ट पद्धतीने लावता येणं खूप गरजेचं आहे (Eye Makeup Tips). म्हणूनच आता कशा पद्धतीने आय लायनर लावण्याचा ट्रेण्ड आहे ते एकदा जाणून घ्या..(how to apply eye liner?)
आय लायनर कसं लावावं?
आतापर्यंत असा ट्रेण्ड होता की डोळ्याचा नाकाजवळचा जो व्ही पॉईंट आहे तिथून आय लायनर लावायला सुरुवात करायची आणि हळूहळू तो ब्रश डोळ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत न्यायचा.
पण आता मात्र या पद्धतीमध्ये पुर्णपणे बदल झाला असून सध्या ही पद्धत आऊटडेटेड मानली जात आहे. म्हणूनच नवी पद्धत तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे.
आता या नव्या पद्धतीनुसार डोळ्याच्या बाह्य भागातला जो व्ही पॉईंट आहे तिथून आय लायनर लावायला सुरुवात करावी, असं सांगितलं आहे.
यासाठी डोळ्याच्या बाहेरच्या व्ही पॉईंटपासून एक थोडी वरच्या दिशेने जाणारी आडवी लाईन काढा.
नाचणीची भाकरी खूप कडक होते? घ्या रेसिपी- भाकरी इतकी छान जमेल की रोजच करून खाल..
आता ज्याठिकाणी तुमच्या आयबॉल्सचा बुबूळ बाह्य भाग आहे तिथे एक पॉईंट घ्या. त्या पॉईंटपासून ते व्ही पॉईंटपर्यंत थोडी जाडसर रेघ घ्या. यानंतर डोळ्याचा सुरुवातीच्या कोपऱ्यापासून अगदी पापण्यांना चिटकवून आय लायनर लावा. बघा तुमचे डोळे बारीक असले तरी कसे छान टपोरे दिसतात..



