केस गळणं (Hair Fall) कमी करण्यासाठी सध्या शॅम्पू, कंडिशनर, हेअर सिरम, हेअर रोल ऑल क्रिम अशी बरीच उत्पादनं लोक वापरत आहेत पण हवातसा परीणाम दिसत नाही. व्यवस्थित जेवण न घेतल्यामुळे केस गळतीचा त्रास वाढतच जातो. तांदूळाचं पाणी, रोजमेरी तेल हे घरगुती उपाय केसांना दाट बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. (Curry Leaves Uses For Hairs)
याच्या वापरानं केसांचे कोणतेही नुकसान होत नाही आणि फार खर्चही होत नाही. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कढीपत्ताही फायदेशीर ठरतो. फोडणीत वापरला जाणारा कढीपत्ता अनेक औषधी गुणांनी परीपूर्ण आहे. कढीपत्ता केसांना लावल्यानं केसांचा पोत सुधारतो आणि लांबसडक होतात केसांचा थिकनेसही वाढतो. (How To Apply Curry Leaves On Hairs to Get Long Hairs)
कढीपत्त्याचे केसांसाठी फायदे
कढीपत्त्यामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देतात व त्यांना मजबूत करतात. २०१५ मध्ये Journal of Pharmacognosy and Phytochemistry मध्ये प्रकाशित एका संशोधनात सांगितले आहे की, कढीपत्त्यातील कार्बोज, अमिनो ऍसिड्स व अल्कलॉईड्स हे केसगळती रोखण्यास मदत करतात. केस काळे व चमकदार राहतात कारण यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांना नैसर्गिक चमक देतात आणि अकाली केस पांढरे होणं रोखतात. कढीपत्त्याचे अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म डोक्यावरील फंगल इंफेक्शन व डँड्रफ कमी करण्यात मदत करतात.
कढीपत्ता केसांवर वापरण्याची योग्य पद्धत
एक कप खोबरेल तेलात १५-२० कढीपत्त्याची पाने घालून गरम करा. पाने काळी होईपर्यंत उकळा. हे तेल गार झाल्यावर आठवड्यातून २ वेळा केसांमध्ये लावा किंवा कढीपत्त्याची पेस्ट बनवूनही केसांना लावू शकता. कढीपत्त्याची पाने वाटून ती केसांवर आणि मुळांवर लावा. ३० मिनिटांनी शॅम्पूने धुवा. या उपायानं तुम्हाला चांगला फरक दिसून येईल.
वय ८६ तरी दोरीच्या उड्या मारण्यात नंबर १ मिलिंद सोमणची आई, पाहा १० मिनिटं उड्या मारण्याचे फायदे
कढीपत्ता एक उत्तम हायड्रेटर आणि मॉईश्चराईजर आहे. केसांसाठी एका नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतो. या पानांमधील प्राकृतिक तेल केसांच्या क्युटिकल्सना कोटींग देतात ज्यामुळे केस सुरक्षित राहतात. ज्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाहीत. केस व्यवस्थित राहतात, याशिवाय केसांना चांगली शाईन मिळते.