कमी वयात केस पांढर होण्याची समस्या आजकाल अनेकांना उद्भवते. केस पांढरे होणं ही एक मोठी समस्या बनलं आहे. पांढरे केस लपवण्याासाठी लोक हेअर डायचा आधार घेतात म्हणून नॅच्युरल हर्बल बनवण्याची एक सोपी पद्धत पाहूया ज्यामुळे तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत होतील. (Apply Curd With These 5 Things Instead Of Hair Dye White Hair Turn Into Black)
हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे, कांदा, दही, नारळाचा वापर करू शकता. हे सर्व पदार्थ नैसर्गिक आहेत. तसंच केसांसाठी फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. बीट, कांदा केसांना पोषण देण्याचं काम करतात आणि नारळ, दही केसांना मजबूत आणि मुलायम बनवतात. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून माईल्ड शॅम्पूने धुवा. हा उपाय नियमित केल्यास पांढरे केस काळे होतील. तसंच केसांना मजबूती येऊन नैसर्गिक चमक येईल.
पांढरे केस कमीच होत नाही? डॉक्टर सांगतात हा घरगुती डाय केसांना लावा, ६ महिने काळे राहतील केस
केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे, याचं कारण चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताण-तणाव हे असू शकते. प्रदूषण, केमिकल्स प्रोडक्ट्सचा वापर केसांवर चुकीचा परिणाम करतो. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केमिकल्स डाय आणि कलर्सचा वापर करू शकता. पण हे केसांना कमजोर बनवतात.
या उपायानं केसांचे कोणतंही नुकसान होत नाही. नियमित हा उपाय केल्यास पांढऱ्या केसांची समस्या उद्भवत नाही. ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत राहतात. हा उपाय केल्यास केसांना नैसर्गिक चमक येते. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याची नियमित काळजी घ्या.
भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी
आवळा, हिरव्या भाज्या, प्रोटीनयुक्त फूड्सचा आहारात समावेश करा. ताणतणाव घेऊ नका. कारण याचा केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. केसांची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. नियमित हे उपाय केल्यास पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होईल.