Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळे तेल वापरून झाले, तरी केस गळणे काही थांबले नाही? ट्राय करा 'हा' नॅचरल उपाय, केस होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:49 IST

Hair Pack to Stop Hair fall : आज आम्ही केस गळणे थांबवण्यासाठी एक खास हेअर पॅक रेसिपी सांगणार आहोत. हा हेअर पॅक जर आठवड्यातून २ ते ३ वेळा लावला तर केसगळतीची समस्या बरीच कमी होऊ शकते.

Hair Pack to Stop Hair fall : केस गळती ही चिंता वाढवणारी समस्या दूर करण्यासाठी बरेच लोक ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून हेअर फॉल ट्रीटमेंट करतात. ज्यासाठी त्यांना भरपूर पैसे खर्च करावे लागतात. पण ही केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी असं काही करण्याची गरज नाही. कारण ही समस्या घरीच आपण दूर करू शकता. घरगुती उपाय यात फायदेशीर ठरू शकतो. फक्त यात अट इतकीच असते हे उपाय नियमितपणे करावे लागतात आणि केसांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. आज आम्ही केस गळणे थांबवण्यासाठी एक खास हेअर पॅक रेसिपी सांगणार आहोत. हा हेअर पॅक जर आठवड्यातून २ ते ३ वेळा लावला तर केसगळतीची समस्या बरीच कमी होऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे हा हेअर पॅक तयार करण्यासाठी जास्त मेहनतही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही. 

हेअर पॅक रेसिपी

सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये २ चमचे अ‍ॅलोव्हेरा जेल काढा. फ्रेश अ‍ॅलोव्हेरा जेल वापराल तर फायदा अधिक होईल. या जेलमध्ये एक चमचा मध घाला. नंतर या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने मिक्स करा. ही मुलायम पेस्ट हेअर पॅकसारखी वापरू शकता.

कसा कराल वापर?

हा हेअर पॅक आपण केसांवरच नाही तर टाळूवरही चांगल्याप्रकारे लावा. चांगला परिणाम मिळवण्यासाठी हा हेअर पॅक जवळपास २० मिनिटे केसांवर लावून ठेवा. २० मिनिटांनंतर साध्या पाण्याने केस धुवावे. नियमितपणे जर हा हेअर पॅक लावाल तर काही आठवड्यांमध्येच आपल्याला सकारात्मक परिणाम दिसू लागेल. केसगळती तर कमी होईलच, सोबतच केस मुलायम, चमकदार होतील आणि केसांची वाढही चांगली होईल.

अॅलोव्हेराचे केसांना फायदे

अॅलोव्हेरा जेल आणि मधाचं हे मिश्रण केसांसाठी वरदान मानलं जातं. कोरफडमध्ये व्हिटॅमिन A, C, E आणि B12 असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत करतात.  यात antibacterial आणि antifungal गुणधर्म असतात, जे टाळूवरील कोंडा आणि इन्फेक्शन कमी करतात त्यामुळे केसगळती कमी होते. कोरफड टाळूचा pH बॅलन्स राखतो, ज्यामुळे केसांची वाढ नैसर्गिकरीत्या सुधारते. गर टाळूवर लावल्याने रक्ताभिसरण वाढतं, त्यामुळे केसांच्या मुळांना अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळतं. 

मधाचे केसांना फायदे  

मध नैसर्गिक humectant आहे, म्हणजे ते ओलावा टिकवून ठेवतं. त्यामुळे केस कोरडे न राहता मऊ आणि चमकदार होतात. मध टाळूला पोषण देतं आणि केसांच्या मुळांना मजबूत करतं, ज्यामुळे केसगळती कमी होते.  मधामध्ये antibacterial आणि antifungal गुणधर्म असतात, जे कोंडा आणि स्काल्प इन्फेक्शन कमी करतात. केसांना ओलावा मिळाल्याने ते कमी तुटतात आणि फ्रिझही कमी होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Natural hair pack: Stop hair fall and get stronger hair!

Web Summary : Tried many oils, still facing hair fall? Use this natural hair pack! Mix aloe vera gel and honey. Apply to scalp for 20 minutes. This pack strengthens hair roots, reduces dandruff, and promotes hair growth, leaving hair soft and shiny.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स