Lokmat Sakhi >Beauty > आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? हेअर फॉल थांबवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? हेअर फॉल थांबवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

कोणता शाम्पू वापरावा, केस खूप गळत असतील तर कधी धुवावेत? असे प्रश्न अनेकांना हमखास पडतात. त्याबद्दल जाणून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:36 IST2025-09-18T13:34:10+5:302025-09-18T13:36:47+5:30

कोणता शाम्पू वापरावा, केस खूप गळत असतील तर कधी धुवावेत? असे प्रश्न अनेकांना हमखास पडतात. त्याबद्दल जाणून घेऊया...

how many times should wash hair in week | आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? हेअर फॉल थांबवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? हेअर फॉल थांबवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

दररोज केस धुवावेत की आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच, कोणता शाम्पू वापरावा, केस खूप गळत असतील तर कधी धुवावेत? असे प्रश्न अनेकांना हमखास पडतात. त्याबद्दल जाणून घेऊया...

तेलकट केस 

जर तुमचे केस लवकर तेलकट होत असतील तर तुम्ही दररोज तुमचे केस धुवावेत. तेलकट स्काल्पमुळे केवळ दुर्गंधी येत नाही तर तुमचे केस देखील निर्जीव दिसतात. अशा परिस्थितीत सौम्य, सल्फेट-फ्री शाम्पू वापरणं योग्य ठरतं.

घाम

जे लोक व्यायाम करतात किंवा सतत कामासाठी बाहेर फिरतात त्यांना खूप घाम येतो. घामामुळे केस चिकट होतात आणि वास येतो. अशा लोकांनी दररोज केस धुवावेत

हेअर प्रोडक्टचा वापर

हेअर स्प्रे, जेल, सीरम किंवा क्रीममुळे तुमच्या केसांमध्ये केमिकल्स जमा होतात. म्हणून कोणतंही हेअर स्टायलिंग प्रोडक्ट वापरल्यानंतर केस धुणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळे डँड्रफ आणि स्काल्प इरिटेशन होऊ शकतं.

कलर हेअर

जर तुमचे केस कलर केलेले असतील, तर आठवड्यातून फक्त दोनदाच शाम्पू लावा. जास्त धुण्याने रंग फिकट होऊ शकतो आणि केसांची नैसर्गिक चमक कमी होऊ शकते.

केसांच्या प्रकारानुसार 

पातळ केस

पातळ केस हे लवकर घाणेरडे होतात, म्हणून नियमित केस धुणे आवश्यक आहे.

जाड केस

तुमचे केस जाड असतील तर आठवड्यातून दोनदा धुणे पुरेसे आहे.

सरळ केस

केस सरळ असतील तर लवकर तेलकट होतात, म्हणून तुमचे केस नियमितपणे धुवा.

कुरळे केस

कुरळे केस उशीरा धुतले तरी चालतात, कारण त्यांना जास्त ओलावा आवश्यक आहे.


 

Web Title: how many times should wash hair in week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.