Join us

Sagar Braid : घरीच सागर वेणी घालण्यासाठी सोप्या ट्रिक्स; ५ मिनिटात होईल सुंदर हेअरस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:41 IST

How Do You Make a Sagar Braid : जर तुम्हाला सागरवेणी स्वत: घालायची असेल तर तुम्ही बाजारातून फ्रेंच पीक स्टँड खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला सागर वेणीची रचना सहज करता येईल.  

स्त्रिया आपला लूक क्लासी बनवण्यासाठी त्यांच्या पोशाखांबरोबरच हेअरस्टाइलकडेही लक्ष देतात. कारण महिलांना सुंदर बनवण्यात केस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे केसांची स्टाइल करताना बहुतांश स्त्रिया मोकळ्या केसांचा पर्याय निवडतात. कारण अनेक हेअरस्टाईल्स खूप स्टायलिश असतात, पण  तसे केस बांधणं खूप अवघड असतं.  सागर वेणी (How do you make a Sagar braid) मात्र, तुम्ही केवळ पारंपारिक पोशाखांवरच नव्हे तर पाश्चात्य कपड्यांवरही या केशरचना करू शकता.  (Sagar choti) आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज सागरवेणी घालू शकता. 

फ्रेंच स्टँडचा वापर करा

जर तुम्हाला सागरवेणी स्वत: घालायची असेल तर तुम्ही बाजारातून फ्रेंच पीक स्टँड खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला सागर वेणीची रचना सहज करता येईल.  हे फ्रेंच स्टँड बाजूने डिझाइन केले जातात. जे केसांच्या मध्यभागी लावले जातात.  मग स्टँडच्या आकारानुसार, तुम्ही तुमचे केस वेगळे करत राहा. जेव्हा केस स्टँडच्या संपूर्ण आकारावर विभाजित केले जातात तेव्हा खाली असलेल्या केसांची वेणी घाला.

कोंब स्टिकचा वापर

सागरवेणी घालण्यासाठी तुम्ही कंगवा देखील वापरू शकता. या युक्तीने तुम्ही सहज सागर वेणी बनवू शकता. ही युक्ती वापरण्यासाठी, आपण प्रथम आपल्या केसांचे दोन भाग करणं आवश्यक आहे. नंतर समोरून केसांमध्ये पफ बनवा आणि हळूहळू कंगव्याच्या मदतीने वेणी बनवण्यासाठी सेक्शन तयार करा. मग आपले केस पिनने सेट करा.

1)

2) 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी