Best oil to increase hair growth : आजकाल केसांसंबंधी एकच नाही तर अनेक समस्यांनी लोक हैराण आहेत. यात सगळ्यात जास्त समस्या आहे केसगळतीची. पोषणाची कमतरता, तणाव, प्रदूषण आणि केमिकल उत्पादनांच्या वापरामुळे केसगळतीची समस्या अधिक वाढते. नंतर पुन्हा ही समस्या दूर करण्यासाठी काही केमिकल्स आणि औषधं घेतली जातात. पण यांनी फायदा मिळेलच असं नाही. अशात काही नॅचरल घरगुती उपाय करूनही तुम्ही केसगळतीची समस्या दूर करू शकता. सोबतच केसांची वाढही करू शकता. यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडीच्या तेलाची मदत घेऊ शकता. खास बाब म्हणजे हे तेल जर खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावलं तर याचे फायदे अधिक वाढतात.
एरंडीचं तेल कसं करतं काम?
एरंडीच्या तेलामध्ये व्हिटामिन ई, ओमेग 6 फॅटी अॅसिड आणि रिसिनोलेक अॅसिड भरपूर असतं. जे डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढतं. यानं केसाच्या मुळांना पोषण मिळतं. ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते. तसेच केस दाट आणि मजबूतही होतात. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी फंगल गुणही असतात, ज्यामुळे कोंडा आणि डोक्याच्या त्वचेत इन्फेक्शनही होत नाही.
खोबऱ्याच्या तेलाचे फायदे
खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी एक नॅचरल मॉइश्चरायजर आहे. ज्यामुळे केस तुटण्या आणि गळण्यापासून बचाव होतो. तसेच केस मुलायम, चमकदार आणि मजबूत होतात. खोबऱ्याचं तेल जर एरंडीच्या तेलात मिक्स करून लावलं तर केसांच्या मूळांपर्यंत पोषण मिळतं. दोन्ही तेलांच्या गुणांमुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतात.
कसं लावाल?
केसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करणं फारच सोपं आहे. यासाठी समान प्रमाणात 2-2 चमचे एरंडीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल घ्या. हे मिश्रण थोडं गरम करा. बोटांच्या मदतीनं हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावून हलक्या हातानं मसाज करा. कमीत कमी 1 ते 2 तास किंवा रात्रभर हे तेल तसंच ठेवा. नंतर माइल्ड शाम्पूनं केस धुवा.
किती वेळा लावाल?
हे खास तेल तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांवर लावू शकता. नियमितपणे हे तेल वापराल तर काही आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. एरंडी आणि खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी एक नॅचरल टॉनिकसारखं काम करतं. त्यामुळे हा उपाय एकदा नक्कीच ट्राय करा.