Flaxseed Benefits For Hair: आजकालच्या अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे कमी वयातच केस गळणे, कोंडा होणे आणि केसांची वाढ खुंटणे अशा समस्या होत असतात. केसांशी संबंधित या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे प्रदूषण, ताण, अनहेल्दी आहार आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर, ज्यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो आणि ते कमकुवत होतात.
आजकाल लोक केस मजबूत आणि घनदाट करण्यासाठी अनेक उपाय करतात, महागडे ट्रीटमेंट घेतात, पण आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या अळशीच्या बिया केसांसाठी अत्यंत फायदेशीर आणि परिणामकारक ठरू शकतात.
केसांसाठी अळशीच्या बिया सुपरफूड
दाट आणि निरोगी केसांसाठी असलेल्या अनेक सुपरफूड्सपैकी एक म्हणजे अळशीच्या बिया. या लहान दिसणाऱ्या बिया पोषक घटकांचा खजिना असतात. त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हियामिन E, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना बळकट करतात आणि नव्या केसांची वाढ वाढवतात.
अळशीतील ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटामिन E आणि लिग्नान्स हे तत्व एकत्रितपणे केसांच्या रोमछिद्रांना मजबूत करतात, केस गळणे कमी करतात आणि केसांची वाढ सुधारतात. व्हिटामिन E हे एक नॅचरल अँटिऑक्सिडंट असल्याने प्रदूषण, उष्णता आणि ताणामुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचं संरक्षण करतं. अशात अळशीच्या बियांचा वापर कसा करावा हे पाहुयात.
सकाळी उपाशीपोटी सेवन करा
अळशीचे बी खाणे हे केसांबरोबरच एकूण आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. सकाळी उपाशीपोटी या खाल्ल्याने अधिक फायदा होतो. या बिया शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि पोषक तत्व केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवतात.
अळशीच्या बियांचे पाणी
केसांच्या वाढीसाठी अळशीच्या बियांचे पाणी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. हे हलके, ताजेतवाने आणि रोजच्या वापरासाठी उत्तम आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा अळशीची बिया रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
अळशीचे तेल
अळशीच्या बियांपासून तयार केलेले तेल हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करतं. यात असलेलं ओमेगा-3 फॅटी अॅसिड टाळूतील सूज कमी करतं आणि ड्राय स्काल्पची समस्या दूर करतं. थोडेसं अळशीचं तेल हलकं कोमट करून केसांच्या मुळांवर लावा आणि बोटांनी मसाज करा. यामुळे केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात.
Web Summary : Flaxseeds are a superfood for hair, packed with omega-3s and vitamin E. Consume them in water, oil, or raw to strengthen hair roots, reduce hair fall, and promote growth. Regular use results in healthy, shiny hair.
Web Summary : अलसी के बीज बालों के लिए एक सुपरफूड हैं, जो ओमेगा-3 और विटामिन ई से भरपूर हैं। बालों की जड़ों को मजबूत करने, बालों का झड़ना कम करने और विकास को बढ़ावा देने के लिए इन्हें पानी, तेल या कच्चे रूप में सेवन करें। नियमित उपयोग से बाल स्वस्थ और चमकदार होते हैं।