उन्हाळा सुरू झाला की,त्यामुळे होणारे टॅनिंग यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण बाजारातील महागडी सनस्क्रीन क्रीम्स विकत घेतो. पण अनेकदा या क्रीम्समध्ये असणारी पॅराबेन्स आणि झिंक ऑक्साइडसारखी केमिकल्स आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.(Homemade Sunscreen) तर, या उत्पादनांच्या किमतीही खिशाला परवडणाऱ्या नसतात. अशा वेळी, पिढ्यानपिढ्या आपल्या घरात वापरले जाणारे खोबरेल तेल हे एक उत्तम नैसर्गिक सुरक्षा कवच ठरू शकते.(Chemical Free Skincare) खोबरेल तेलामध्ये नैसर्गिकरित्या SPF असते. जेव्हा आपण त्यात काही नैसर्गिक घटक मिसळतो, तेव्हा ते वापरण्यासाठी अधिक चांगले असते. हे घरगुती सनस्क्रीन केवळ सूर्याच्या अतिनील किरणांपासून (UV Rays) संरक्षण करत नाही, तर त्वचेला खोलवर ओलावा (Moisturize) देऊन तिला मऊ आणि तजेलदार बनवते. पैशांची बचत आणि त्वचेची पूर्ण सुरक्षा असा हा 'टू-इन-वन' फॉर्म्युला आहे. चला तर मग, जाणून घेऊया खोबरेल तेलात नेमके कोणते ५ पदार्थ मिसळून आपण घरीच सनस्क्रीन कसं तयार करू शकतो.
उन्हाळ्यात चेहऱ्याला चुकूनही लावू नका ६ गोष्टी, येतील भरपूर पिंपल्स-डाग, वाढेल वैताग
नॅचरल सनस्क्रीन बनवण्यासाठी लागणारं साहित्य
खोबरेल तेल- १/४ कप शिया बटर- २ मोठे चमचे मधमाशांचे मेण - १ मोठा चमचा कोरफड जेल- २ मोठे चमचे व्हिटॅमिन ई ऑईल - १ छोटा चमचा किंवा २-३ कॅप्सूलमधील तेल.रॅस्पबेरी किंवा गाजर बियांचे तेल - १०-१२ थेंब
कृती
1. एका काचेच्या भांड्यात खोबऱ्याचे तेल, शिया बटर आणि मेण एकत्र घ्या. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा आणि त्या गरम पाण्यावर हा बाऊल ठेवा. चमच्याने सतत ढवळत राहा. साहित्य विरघळल्यानंतर कोमट होण्यास ठेवा.
2. थंड झाल्यानंतर मिश्रण घट्ट होऊ देऊ नका. या कोमट मिश्रणात कोरफडीचा गर आणि व्हिटॅमिन ई ऑईल घाला. जर तुम्ही रॅस्पबेरी किंवा कॅरट सीड ऑईल घालणार असू, तर यावेळीच घाला.
3. एका छोट्या विस्करने किंवा चमच्याने हे मिश्रण ५-७ मिनिटात फेटून घ्या. जोपर्यंत त्याला पांढरा शुभ्र रंग आणि मऊ क्रीमरसारखे टेक्सचर येत नाही, तोपर्यंत फेटा.
4. तयार झालेले सनस्क्रीन एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे सनस्क्रीन थंड आणि कोरड्या जागी २ ते ३ महिने ठेवल्यास आरामात वापरू शकता.
वापरण्याची पद्धत
उन्हात घराबाहेर पडण्याआधी १५-२० मिनिटे हे सनस्क्रीन चेहरा, मान आणि हातांवर लावा.
जर आपण जास्त वेळ उन्हात असाल, तर दर ३ तासांनी हे पुन्हा लावा.
Web Summary : Avoid harsh chemicals! Create effective, moisturizing sunscreen at home using coconut oil, shea butter, beeswax, aloe vera, and vitamin E oil. This homemade sunscreen protects from UV rays and keeps skin soft. Apply before sun exposure and reapply every three hours.
Web Summary : कठोर रसायनों से बचें! नारियल तेल, शिया बटर, मोम, एलोवेरा और विटामिन ई तेल का उपयोग करके घर पर प्रभावी, मॉइस्चराइजिंग सनस्क्रीन बनाएं। यह होममेड सनस्क्रीन यूवी किरणों से बचाता है और त्वचा को मुलायम रखता है। धूप में निकलने से पहले लगाएं और हर तीन घंटे में दोबारा लगाएं।