Join us

ऐन तारुण्यात त्वचा लूज पडली, सुरकुत्या वाढल्या? 'असा ' करा स्किन टाईट करणारा घरगुती मास्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 15:19 IST

Homemade Skin Tightening Face Pack : best face pack for wrinkles and loose skin : instant skin tightening mask at home : skin tightening face mask for aging skin : होममेड स्किन टाईटनिंग फेसमास्क, लूज पडलेली स्किन घट्ट करुन त्वचा तरुण दिसण्यास मदत करतो.

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात आणि त्वचेवरही त्याचा थोडाफार परिणाम दिसून येतो. चेहऱ्याची त्वचा सैल पडणे, सुरकुत्या वाढणे आणि त्वचा निस्तेज दिसणे यांसारख्या समस्या अनेक महिलांना सतावतात. वय वाढलं की, चेहऱ्यावरील त्वचा हळूहळू लूज पडायला लागते आणि स्किनचा नैसर्गिक (Homemade Skin Tightening Face Pack) तजेला कमी होतो. एकदा का त्वचा सैल पडली की ती पुन्हा टाईट करणे (best face pack for wrinkles and loose skin) कठीण होते. अशा परिस्थितीत, लूज पडलेली त्वचा पुन्हा टाईट करण्यासाठी आपण महागड्या ब्यूटी ट्रीटमेंट्स आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करतो. परंतु लूज पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी टाईट करण्यासाठी आर्टिफिशियल उपायांपेक्षा (instant skin tightening mask at home) घरगुती व नैसर्गिक उपायच अधिक फायदेशीर ठरतात(skin tightening face mask for aging skin).

आपल्या घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक आणि पारंपरिक पदार्थांपासून आपण घरगुती फेसमास्क तयार करू शकतो, ज्यामुळे त्वचेला घट्टपणा येण्यास मदत मिळेल. या घरगुती उपायांमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल आणि त्वचा वयापेक्षा अधिक तरुण दिसेल. घरच्याघरीच लूज पडलेली त्वचा टाईट करण्यासाठी आपण घरगुती पदार्थांचा वापर करून 'स्किन टाईटनिंग' करु शकतो. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला फेसमास्क त्वचेला पोषण देतो, लूज पडलेली स्किन घट्ट करुन त्वचा तरुण दिसण्यास मदत करतो. होममेड स्किन टाईटनिंग फेसमास्क कसा करायचा ते पाहूयात. 

 होममेड स्किन टाईटनिंग फेसमास्क... 

वयोमानानुसार लूज पडलेली त्वचा टाईट करण्यासाठी, घरच्याघरीच फेसमास्क तयार करताना आपल्याला २ ते ३ टेबलस्पून अळशीच्या बियांची पावडर, १ कप पाणी, १ टेबलस्पून तांदुळाचे पीठ आणि १/२ टेबलस्पून मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. लूज पडलेली त्वचा टाईट करण्यासाठी घरगुती फेसमास्क कसा तयार करायचा हा खास उपाय home_remedies_with_shalini या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

पावसाळ्यात केसांचा खराटा झाला? लावा ‘असे’ भेंडीचे पाणी, मऊ सुळसुळीत चमकदार होतील केस...

होममेड स्किन टाईटनिंग फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी अळशी मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात कपभर पाणी घेऊन त्यात मिक्सरमधून बारीक करून घेतलेली अळशीच्या बियांची पावडर घालावी. हे मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर जोपर्यंत या अळशीचे घट्टसर अशा जेलमध्ये रुपांतर होत नाही तोपर्यंत ते मंद आचेवर गरम करावे. जेल तयार झाल्यानंतर मिश्रण एका बाऊलमध्ये काढून थंड करुन घ्यावे. मग त्यात तांदुळाची पावडर व मध घालावे. सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. होममेड स्किन टाईटनिंग फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे. 

या स्किन टाईटनिंग फेसमास्कचा वापर कसा करावा ? 

तयार स्किन टाईटनिंग फेसमास्क ब्रशच्या मदतीने किंवा हातावर घेऊन त्वचेवर वरच्या दिशेने लावावा. लूज पडून गळलेल्या त्वचेवर हा फेसमास्क लावून १५ ते २० मिनिटे किंवा पूर्णपणे सुकेपर्यंत तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. हा उपाय महिनाभर आठवड्यातून किमान ३ वेळा केल्यास हळूहळू फरक दिसून येतो. 

स्तनांचा आकार मोठा असेल, तर ब्रेसियर घेताना करुन नका ६ चुका - 'अशी' ब्रा घालणे ठरेल फायद्याचे...

गरोदरपणानंतर पोटावर-दंडावर मोठ्ठे स्ट्रेच मार्क आले? ‘हे’ पारंपरिक तेल लावा-स्ट्रेच मार्क होतील कमी...

स्किन टाईटनिंग फेसमास्कचे फायदे... 

१. अळशी :- अळशीचे नैसर्गिक जेल त्वचेला घट्ट करून सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

२. तांदुळाचे पीठ :- तांदुळाच्या पिठातील स्टार्च त्वचेला टाईटनेस देतो व चेहऱ्याचा ग्लो वाढवतो.

३. मध :- मध त्वचेचे मॉइश्चर संतुलित ठेवून लूज स्किन टाईट करण्यास उपयुक्त ठरतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय