White Hair Problem Home Remedy : कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या आजकाल भरपूर वाढली आहे. ज्यासाठी आपली चुकीची लाइफस्टाईल, केसांची योग्य काळजी न घेणे अशा गोष्टी कारणीभूत असतात. अलिकडे भरपूर वापरल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांमुळे ही समस्या अधिक वाढतीये. आणखी चिंतेची बाब म्हणजे केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी आणखी केमिकल असलेल्या गोष्टींचा वापर केला जातो. मात्र, असेही अनेक घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीनं पांढरे झालेले केस काळे करू शकता.
खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी खूप फायदेशीर असतं. त्यात जर काही गोष्टी मिक्स करून लावल्या तर केसगळतीसोबतच केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. एखादं खासप्रकारचं तेल तयार करून वापरलं तर केसांसोबतच चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलवण्यास मदत मिळू शकते. खोबऱ्याच्या तेलात काही गोष्टी घालून लावल्यास काही दिवसांतच आपले पांढरे केस काळे होऊ शकतात.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस
अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि केमिकलच्या वापरामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे ते लगेच ठीक केले जाऊ शकत नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांच्या मुळात लावा. केसांच्या मुळात या तेलाने चांगली मालिश करा. लिंबाच्या रसात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा वापरा.
खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ता
हे दोन्ही मिश्रण पांढरे केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय मानले जातात. जर तुमचेही केस कमी वयात पांढरे झाले असतील तर तुम्हीही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ताही वापरू शकता. यासाठी एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल गरम करा. त्यात कढीपत्ता टाका. थोड्या वेळाने हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावा. काही महिन्यात तुमचे केस पुन्हा काळे होतील.
खोबऱ्याचं तेल, दूध आणि केळी
हा एक खास हेअर मास्क आहे. हा मास्क केसांवर लावल्यावर केस लांब होतात. मुलायम होता आणि केस चमकदारही होतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात थोडं दूध आणि एक केळी चुरून मिक्स करा. हा हेअर मास्क केसांवर एक तास लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवून घ्या. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करा. तुम्हाला फरक दिसून येईल.