सध्या केस गळण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांचे केस गळत आहेत. केस धुतल्यानंतर तर बाथरुममध्ये गळून पडलेले कित्येक केस दिसतात. यासोबतच कमी वयात केस पांढरे होणे, केसांमध्ये खूप कोंडा होणे, असा त्रासही अनेकांना होतोच. केसांच्या या सगळ्या तक्रारी कमी करायच्या असतील तर घरच्याघरी केसांसाठी एक खास तेल तयार करा आणि आठवड्यातून दोन वेळा त्या तेलाने डोक्याला मालिश करा. काही दिवस हा उपाय नियमितपणे केला तर लवकरच केसांमध्ये खूप चांगला बदल दिसून येऊ शकतो. हे तेल कसं तयार करायचं याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Homemade Oil for Black, Thick and Shiny Hair)
केसांसाठी तेल कसं तयार करावं?
साहित्य
पाव लीटर खोबरेल तेल
कडिपत्त्याची १० ते १२ पाने
२ टेबलस्पून मेथी दाणा
पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब
३ ते ४ जास्वंदाची फुलं
२ टेबलस्पून अळीव
कृती
हे तेल तयार करण्याची कृती अतिशय सोपी आहे. त्यासाठी एक लोखंडी कढई घ्या आणि ती गॅसवर गरम करायला ठेवा.
कढई चांगली गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये खोबरेल तेल घाला. त्यानंतर साधारण एखाद्या मिनिटाने त्या तेलामध्ये कडिपत्त्याची पाने घाला. तेल चांगले गरम होऊ द्या. तेलाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
आता या कडक तापलेल्या तेलामध्ये जास्वंदाची फुलं, अळीव आणि मेथी दाणे घाला. कढईवर झाकण ठेवा आणि रात्रभर हे तेल तसेच राहू द्या.
ढाबास्टाईल हराभरा पनीर करण्याची चमचमीत रेसिपी, मोजक्याच साहित्यात करा सुपरटेस्टी भाजी
त्यानंतर ते एखाद्या एअरटाईट बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून दोन वेळा या तेलाने डोक्याला मालिश करा. यानंतर कमीतकमी २ तास तासाने शाम्पू करून केस धुवून टाका. हे तेल डोक्याला रात्रभर ठेवलं तरी चालेल.
