Lokmat Sakhi >Beauty > घरच्याघरीच करा कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग! केमिकल लावून त्वचा खराब करू नका, हा घ्या नैसर्गिक उपाय...

घरच्याघरीच करा कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग! केमिकल लावून त्वचा खराब करू नका, हा घ्या नैसर्गिक उपाय...

Homemade Neem Wax : How to make homemade neem Wax : Homemade neem jaggery wax for painless body hair removal : Homemade Neem Powder Wax : केमिकल्सयुक्त वॅक्सिंगला करा बाय - बाय, त्वचेचं आरोग्य व सौंदर्य जपा नैसर्गिक पद्धतीने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 12:10 IST2025-05-13T12:09:50+5:302025-05-13T12:10:37+5:30

Homemade Neem Wax : How to make homemade neem Wax : Homemade neem jaggery wax for painless body hair removal : Homemade Neem Powder Wax : केमिकल्सयुक्त वॅक्सिंगला करा बाय - बाय, त्वचेचं आरोग्य व सौंदर्य जपा नैसर्गिक पद्धतीने...

Homemade Neem Wax How to make homemade neem Wax Homemade neem jaggery wax for painless body hair removal Homemade Neem Powder Wax | घरच्याघरीच करा कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग! केमिकल लावून त्वचा खराब करू नका, हा घ्या नैसर्गिक उपाय...

घरच्याघरीच करा कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग! केमिकल लावून त्वचा खराब करू नका, हा घ्या नैसर्गिक उपाय...

आपल्याकडे कडुलिंबाच्या पानाला फार महत्वाचे स्थान आहे. कडुलिंबाच्या पानांमध्ये असंख्य औषधी गुणधर्म असून आरोग्य आणि सौंदर्य यासाठी खास या पानांचा (Homemade Neem Wax) वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कडुलिंबामध्ये असलेले (How to make homemade neem Wax) औषधी गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतात. आपल्या त्वचेवरील पुरळ, रॅशेज, मुरुम अशा त्वचेच्या अनेक समस्यांसाठी कडुलिंबाची पाने विशेष (Homemade neem jaggery wax for painless body hair removal) उपयोगी ठरतात. सध्या काळात केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्समुळे होणाऱ्या त्रासांमुळे अनेकजण नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत(Homemade Neem Powder Wax).

त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंग करतोच. परंतु हे वॅक्सिंग करताना केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा जर आपण काही घरगुती पदार्थांच्या मदतीने वॅक्सिंग तयार केले तर त्याचे त्वचेला फायदेच होतात. अशा परिस्थितीत, त्वचेवरील केसांचे वॅक्सिंग करण्यासाठी आपण कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग देखील करु शकतो.  कडुलिंबाच्या पानांचे वॅक्स घरच्या घरी तयार करता येते  आणि त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता केस काढण्यासोबतच त्वचेचे आरोग्यही सुधारते. कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग (Neem Leaf Waxing) हा एक वॅक्सिंगचा नॅचरल उपाय आहे. घरच्याघरीच कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग करण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात.  

साहित्य :- 

१. गूळ - १ कप 
२. लिंबाचा रस - एका लिंबाचा रस 
३. कडुलिंबाच्या पानांची पावडर - १ टेबलस्पून 

स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...


केसांना लावा विड्याच्या पानांचा हेअरमास्क, हिरवीगार पानं करतील जादू - केसांच्या समस्या राहतील दूर...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका भांड्यात किसून बारीक केलेला गूळ घेऊन त्यात लिंबाचा रस घालावा. 
२. आता या सगळ्या मिश्रणात एक टेबलस्पून कडुलिंबाच्या पानांची पावडर घालावी. 
३. त्यानंतर सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. 
४. आता गॅसच्या मंद आचेवर हे सगळे मिश्रण ठेवून एकजीव करून वितळवून घ्यावे. 
५. आपले घरगुती कडुलिंबाच्या पानांचे वॅक्स तयार आहे. 

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

याचा वापर कसा करावा? 

कडुलिंबाच्या पानांचे वॅक्स तयार झाल्यावर ते हलके थंड झाल्यावर त्वचेवर लावून घ्यावे. त्यानंतर त्यावर वॅक्स पट्टी लावून ओढून घ्यावे. असे केल्यास त्वचेवरील केस अगदी सहज निघून वॅक्सिंग होईल. 

कडुलिंबाच्या पानांचे वॅक्सिंग करण्याचे फायदे... 

१. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील जंतुसंसर्ग, पुरळ, मुरुम यांपासून संरक्षण करतात.

२. वॅक्सिंग करताना डेड स्किन निघते आणि त्यामुळे त्वचा उजळ, मऊ व स्वच्छ दिसते.

३. कडुलिंबाच्या पानांतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा पोत सुधारतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात.

Web Title: Homemade Neem Wax How to make homemade neem Wax Homemade neem jaggery wax for painless body hair removal Homemade Neem Powder Wax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.