हिवाळा येताच आपल्याबरोबर अनेक समस्या घेऊन येतो. थंडीचे दिवस सुरु झाले की, त्वचेसोबतच केसांच्या समस्याही डोकं वर काढतात. थंडीमुळे टाळूची त्वचा कोरडी पडते आणि कोंड्याचे प्रमाण वाढते. या कोंड्यामुळे होणारी खाज इतकी सतावते की चारचौघांत वावरतानाही आपल्याला संकोच वाटू लागतो. डँड्रफमुळे फक्त केसांचा लूकच खराब होत नाही, तर टाळू कोरडी होऊन अस्वस्थताही वाढते. थंड हवा, वातावरणातील कमी आर्द्रता आणि गरम पाण्याने अंघोळ यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये डँड्रफ वाढतो आणि स्काल्पला खूप खाज सुटते. प्रामुख्याने हिवाळ्यात केसांतील डँड्रफचे प्रमाण वाढून जेव्हा तो आपल्या खांदयावर पडू लागतो तेव्हा नकोसे वाटते. अशा परिस्थितीत, घरच्याघरीच उपलब्ध असलेला कापूर हा एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो(home remedies to remove dandruff).
कापूरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे तो (camphor and coconut oil for dandruff) डँड्रफ कमी करण्यास आणि खाज शांत करण्यास मदत करतो. हिवाळ्यात जेव्हा डँड्रफ नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा कापूर केसांसाठी 'मॅजिक'प्रमाणे काम करते. कापूरच्या वापराने केवळ कोंडाच दूर होत नाही, तर टाळूला थंडावा मिळून रक्ताभिसरणही सुधारते यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होण्यास (homemade natural remedy for dandruff) मदतच होते. हिवाळ्यात केसांचे आरोग्य जपण्यासाठी, डँड्रफचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि खाज त्वरित थांबवण्यासाठी कापूर कसा वापरावा ते पाहूयात.
हिवाळ्यात केसांतील कोंड्याचे प्रमाण जास्तच वाढले...
हिवाळ्याच्या दिवसांत जर डोक्यांत कोंड्याचे प्रमाण खूपच वाढले असेल तर हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला २ ते ३ टेबलस्पून खोबरेल तेल, ५ ते ६ कापूर वड्या आणि २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
गुडघ्यापर्यंत लांब केस हवे तर करा 'या' तेलानं करा मसाज, केस इतके वाढतील , की सांभाळणंही कठीण...
नेमका डँड्रफ घालवण्यासाठी उपाय काय आहे ?
हा घरगुती उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला फार कमी वेळ लागेल. सर्वातआधी कापूर वड्या घ्या आणि त्या नीट कुस्करून त्याची बारीक पावडर तयार करा. आता एका वाटीमध्ये शुद्ध खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्या. तयार झालेल्या या मिश्रणात कापूरची पावडर टाका आणि सर्व घटक व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करत लावा. याच्या पहिल्याच वापरामुळे केसांतील कोंडा बऱ्याच अंशी कमी होतो आणि टाळूला सुटणारी खाज थांबते. नियमित वापरामुळे केसगळतीची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
डँड्रफ कमी करण्यासाठी हा उपाय कसा आहे फायदेशीर...
१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल स्काल्पला खोलवर ओलावा पुरवते, ज्यामुळे हिवाळ्यातील कोरडेपणामुळे होणारा कोंडा कमी होतो.
२. कापूर वड्या :- कापूरमधील अँटी-फंगल गुणधर्म कोंडा निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करतात आणि टाळूला सुटणारी खाज त्वरित थांबवतात.
३. लिंबाचा रस :- लिंबातील सायट्रिक ॲसिड टाळूची पीएच पातळी संतुलित राखते आणि केसांतील चिकटपणा व कोंडा मुळापासून साफ करण्यास मदत करते.
