Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरीच करा मसूर डाळीने हुबेहूब पार्लरसारखेच क्लिनअप! फक्त १५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींसारखा ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2026 16:58 IST

homemade masoor dal cleanup : masoor dal face cleanup at home : फक्त चमचाभर मसूर डाळ वापरुन आपण चक्क घरच्याघरीच, पार्लरसारखे त्वचेचे क्लीनअप करु शकतो.

आपली त्वचा सुंदर, देखणी, ग्लोइंग व नितळ असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य जपून ठेवण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतोच. स्वच्छ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर नियमित क्लीनअप करणे अत्यंत गरजेचे असते. क्लीनअपमुळे त्वचेवरील मळ, डेड स्किन, अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स दूर होतात व त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. अनेकदा आपण पार्लरमध्ये जाऊन महागडे क्लीनअप करून घेतो, पण ते प्रत्येकवेळीच शक्य होईलच असे नाही. अशावेळी घरच्याघरी, अगदी सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचेचे क्लीनअप करता आले तर... किती बरं होईल...(homemade masoor dal cleanup).

घरातीलच एक साधासुधा पदार्थ म्हणजे मसूर डाळ. फक्त चमचाभर मसूर डाळ वापरुन आपण चक्क घरच्याघरीच, पार्लरसारखे त्वचेचे क्लीनअप करु शकतो.  हे क्लीनअप केमिकलमुक्त, सुरक्षित आणि सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. मसूर डाळीने (masoor dal face cleanup at home) घरच्याघरीच त्वचेचे क्लीनअप कसे करायचे आणि त्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात... 

मसूर डाळ त्वचेसाठी का फायदेशीर आहे?

मसूर डाळीत नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. तसेच त्यात प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. मसूर डाळ त्वचेतील मळ काढून टाकते, पोअर्स साफ करते आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते.

रेखाची 'एव्हरग्रीन' स्टाईल ते आलियाचा 'मॉडर्न' लूक; बॉलिवूड सुंदरींना वेड लावणाऱ्या या ५ साड्या पाहिल्या का?

मसूर डाळीने क्लीनअप करण्यासाठी लागणारे साहित्य :-

मसूर डाळ २ टेबलस्पून, कच्चे दूध किंवा गुलाबपाणी १ टेबलस्पून, १ टेबलस्पून मध आणि गरजेनुसार पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

मसूर डाळीने क्लीनअप करण्याची पद्धत.... 

१. क्लिंझिंग :- दुधात भिजवलेली मसूर डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात गरजेनुसार थोडे दूध किंवा गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने १ ते २ मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचेवरील मळ आणि धूळ निघून जाते.

२. स्क्रबिंग :- हीच तयार पेस्ट बोटांवर घेऊन त्वचेवर गोलाकार आकारात फिरवत हळुवारपणे सौम्य स्क्रबिंग करा. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचा मऊ व स्वच्छ होते.

३. फेसमास्क :- आता उरलेली पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे तशीच लावून ठेवा. मसूर डाळ त्वचेला पोषण देते आणि नैसर्गिक टोन सुधारण्यास मदत करते.

४. टोनिंग :- कोमट पाण्याने चेहरा धुवा नंतर गुलाबपाणी लावून त्वचेचे टोनिंग करा.

५. मॉइश्चरायझिंग :- शेवटी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार हलके मॉइश्चरायझर किंवा अ‍ॅलोवेरा जेल लावा.

खांद्यावर पडणारा कोंडा होईल गायब! खोबरेल तेलात २ पानं मिसळून करा मसाज - डँड्रफ वाढण्याची डोकेदुखी होईल कमी... 

मसूर डाळीने क्लीनअप करण्याचे फायदे... 

१. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यासाठी मसूर डाळ अत्यंत गुणकारी आहे.

२. मसूर डाळीच्या क्लीनअपमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. 

३. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

४. त्वचा मऊ, कोमल आणि फ्रेश दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Masoor dal cleanup at home: Get celebrity glow in 15 minutes.

Web Summary : Achieve radiant skin with a homemade masoor dal cleanup. Masoor dal exfoliates, removes impurities, and promotes a natural glow. Follow simple steps for cleansing, scrubbing, masking, toning, and moisturizing for soft, fresh skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय