Join us

घरच्याघरी फक्त १० मिनिटांत करा पार्लरसारखं मॅनिक्युअर, सुंदर मऊ हात पाहून म्हणाल, क्या बात है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 16:52 IST

Homemade Manicure Tips for Beautiful Hands: Easy Manicure Routine for Healthy Hands in 10 Minutes: Simple Steps for a Quick Homemade Manicure: DIY Manicure for Glowing Hands in 10 Minutes: 10-Minute Manicure for Beautiful Soft Hands: Effective Manicure Tips for Perfect Hands at Home: काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो केल्या तर काळपटलेले हात गोरे होण्यास मदत होतील.

हल्ली धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला आरोग्याची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. चेहऱ्यासोबत आपल्याला शरीराच्या इतर अवयवांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.(Homemade Manicure Tips for Beautiful Hands) महागड्या केमिकल उत्पादनांचा चेहऱ्यावर वापर केल्याने रॅशेस, पुरळ येण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा यामुळे त्वचेचा रंग देखील बिघडतो. (Easy Manicure Routine for Healthy Hands in 10 Minutes)आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच हात आणि पायांचे देखील. उन्हाळ्यात त्वचा लवकर टॅन होते.(Simple Steps for a Quick Homemade Manicure) चेहऱ्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनाचा वापर करतो. सनस्क्रिन, टोनर वापरून चेहऱ्याची काळजी घेतो. परंतु, हाताची त्वचा लगेच टॅन होते. आपल्या हाताचे टॅनिंग घालवण्यासाठी किंवा काळपटलेले हात अधिक गोरे करण्यासाठी आपण मॅनिक्युअर करतो.(Manicure for Glowing Hands in 10 Minutes) महागड्या पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअरवर अधिकचे पैसे देखील खर्च करतो. पण आता हे करण्यासाठी आपल्याला महागड्या पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. परंतु काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो केल्या तर काळपटलेले हात गोरे होण्यास मदत होतील. तसेच आपल्या नखांचे सौंदर्य देखील वाढेल. (Effective Manicure Tips for Perfect Hands at Home)

आलिया भट्ट- प्रियंका चोप्रा ड्राय शाम्पूने केस धुतात; हेअर स्टायलिश फायदे, घरीच्याघरी ड्राय शाम्पू 'असा' बनवा..

1. क्लिनजिंग 

सगळ्यात आधी हात स्वच्छ करण्यासाठी पाण्यात सोडा, लिंबू, गुलाबाच्या पाकळ्या घाला. पाणी व्यवस्थित मिसळून घ्या. त्यानंतर त्यात आपले दोन्ही हात बुडवा. आता त्याच पाण्यातील लिंबू हातांवर फिरवून घ्या. 

2. स्क्रबिंग  

आता हातावर स्क्रबिंग करा. आपल्या घरात स्क्रब असलेल तर त्याने करा किंवा कॉफी आणि साखरेचा मास्क बनवून हातावर चोळा. चांगल्या प्रकारे स्क्रब चोळून ओल्या कापडाने पुसून घ्या. 

3. मास्क 

हातांना लावण्यासाठी मास्क तयार करा. यासाठी आपल्याला चण्याचे पीठ, हळदी पावडर, कोरफड जेल आणि गुलाब पाणी एकत्र करुन घ्या. हा मास्क तयार करुन हातांवर लावा. मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने हात धुवा. 

4. सिरम 

हातांवर लावण्यासाठी आपण सिरम वापरु शकतो. चेहऱ्यावर जो सिरम लावतो त्याचा वापर करता येईल. ज्यामुळे हाताची त्वचा उजळ्यास मदत होईल. हा सिरम हातावर लावून व्यवस्थित प्रकारे चोळून घ्या. 

5. मॉइश्चरायझर 

हातांवर मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर दोन्ही हात प्लास्टिक मास्कमध्ये घालून व्यवस्थितपणे चोळून घ्या. ज्यामुळे त्वचा चमकदार होईल. नखांना आवडत्या रंगाची नेलपट लावून तिचे सौंदर्य आणखी वाढवता येईल. अशाप्रकारे आपण पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी मॅनिक्युअर करु शकतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी