हिवाळा ऋतू म्हणजे त्वचेसाठी फारच त्रासदायक... या थंडीच्या दिवसांत आरोग्यासोबतच त्वचेची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, त्वेचेतील ओलावा कमी होतो आणि नैसर्गिक चमक कुठेतरी हरवून जाते. कितीही क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावले तरी त्वचेवर चमक आणि मऊपणा टिकत नाही. अशावेळी आयुर्वेदात सांगितलेले कुमकुमादी तेल म्हणजे त्वचेसाठी वरदानच! त्वचा उजळवणे, डार्क स्पॉट्स कमी करणे, सुरकुत्या हटवणे आणि ग्लो वाढवणे या सर्व गोष्टींसाठी हे तेल अत्यंत उपयुक्त मानले जाते(easy kumkumadi oil preparation method).
कुमकुमादी तेल त्वचेला नैसर्गिक तेज आणि खोलवर पोषण देते विशेषतः हिवाळ्यात, हे तेल त्वचेसाठी अमृतासमान ठरते. परंतु बाजारात उपलब्ध असलेले कुमकुमादी तेल महाग मिळते तसेच ते शुद्ध असेल की नाही याची देखील शाश्वती नसते. यासाठीच, कुमकुमादी तेल अगदी कमी खर्चात आणि घरच्याघरीच सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे (how to make kumkumadi oil at home) याची सहजसोपी पद्धत पाहूयात. हिवाळ्यातही त्वचेला गोल्डन ग्लो येण्यासाठी (homemade kumkumadi oil) घरच्याघरीच कुमकुमादी तेल नक्की तयार करुन पाहा.
साहित्य :-
१. खोबरेल तेल - २ कप
२. बदामाचे तेल - १ कप
३. तिळाचे तेल - १ कप
४. केसर काड्या - १ टेबलस्पून
५. आंबे हळद - १ टेबलस्पून
६. सुक्या गुलाबाच्या पाकळ्या - २ टेबलस्पून
७. चंदन पावडर - १ टेबलस्पून
८. मंजिष्ठा - ४ ते ५ काड्या
९. मुलेठी - ४ ते ५ काड्या
कुमकुमादी तेल घरच्याघरीच करण्याची सोपी पद्धत...
बाहेर बाजारांत महागड्या किंमतीत विकले जाणारे कुमकुमादी तेल घरच्याघरीच देखील तयार करणे सोपे आहे. सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात खोबरेल तेल, बदामाचे तेल, तिळाचे तेल अशी तिन्ही तेल एकत्रित मिसळून घ्यावी. गॅसच्या मंद आचेवर हे भांडं ठेवून तेल हलकेच गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात केसर काड्या, आंबे हळद, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, चंदन पावडर, मंजिष्ठा, मुलेठीच्या काड्या घालाव्यात. सगळे मिश्रण चमच्याने हलकेच हलवून सगळे घटक एकत्रित करून घ्यावे. गॅसच्या मंद आचेवर हे तेल २० मिनिटांसाठी थोडे गरम करून घ्यावे. मग गॅस बंद करून तेल तसेच ठेवून ते थोडे थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर सुती कापडाच्या किंवा गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. गाळून घेतलेलं तेल एका स्वच्छ काचेच्या एअर टाईट कंटेनर किंवा बरणीत भरून व्यवस्थित कोरड्या जागी, थेट सूर्यप्रकाशापासून लांब स्टोअर करुन ठेवावे. कुमकुमादी तेल वापरण्यासाठी तयार आहे.
शिळ्या भातानं चमकेल त्वचा, ५ प्रकारे लावा भाताचा पॅक-काचेसारखी कोरियन त्वचा मिळण्याचा सोपा उपाय...
साधा ब्लाऊजही दिसेल डिझायनर! पाहा १० ट्रेंडी डोरी डिझाईन्स - ब्लाऊजला देईल मॉडर्न आणि एलिगंट टच...
हिवाळयात कुमकुमादी तेल त्वचेसाठी वापरण्याचे फायदे...
१. कुमकुमादी तेलात असलेले केसर या मुख्य घटकामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि नैसर्गिक चमक वाढते. हे तेल त्वचेला ऊर्जा देते, ज्यामुळे त्वचा अधिक टवटवीत आणि सतेज दिसते.
२. चेहऱ्यावरील मुरमांचे डाग, वयामुळे आलेले डाग आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.
३. असमान त्वचा टोन सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा एकसमान रंगाची आणि निरोगी दिसते.
४. तेल त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते, ज्यामुळे त्वचा अधिक घट्ट आणि तरुण दिसते.
५. या तेलामध्ये असलेल्या चंदन आणि मंजिष्ठासारख्या घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम आणि फोड कमी करण्यास मदत करतात.
