Lokmat Sakhi >Beauty > केस इंचभर वाढायलाही महिनोंमहिने लागतात? जास्वंदाचा 'हा' उपाय करा- लांबसडक दाट होतील..

केस इंचभर वाढायलाही महिनोंमहिने लागतात? जास्वंदाचा 'हा' उपाय करा- लांबसडक दाट होतील..

Home Hacks For Fast Hair Growth: केसांची वाढ होतच नसेल तर जास्वंदाची पानं- फुलं घेऊन हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(homemade hibiscus flower gel for long and shiny hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 13:48 IST2025-04-26T13:26:10+5:302025-04-26T13:48:10+5:30

Home Hacks For Fast Hair Growth: केसांची वाढ होतच नसेल तर जास्वंदाची पानं- फुलं घेऊन हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(homemade hibiscus flower gel for long and shiny hair)

homemade hibiscus flower gel for long and shiny hair, how to make hair growth faster, home hacks for fast hair growth | केस इंचभर वाढायलाही महिनोंमहिने लागतात? जास्वंदाचा 'हा' उपाय करा- लांबसडक दाट होतील..

केस इंचभर वाढायलाही महिनोंमहिने लागतात? जास्वंदाचा 'हा' उपाय करा- लांबसडक दाट होतील..

Highlightsहे पाणी तुमच्या केसांना लावल्यानंतर कोणतंही दुसरं कंडिशनर लावण्याची गरज नाही. कारण घरी तयार केलेल्या या जास्वंदाच्या जेलमुळे केस खूप मऊ आणि चमकदार होतात. 

हल्ली केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. बहुतांश जणांना केस गळणे, केस पातळ होणे, केसांना वाढ नसणे, केसांना फाटे फुटणे, कमी वयात केस पांढरे होणे, असे अनेक त्रास होतात. या समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही निश्चितच आहेत. असाच एक केसांचं गळणं कमी करून केस छान दाट, लांब होण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, ते पाहूया (Home Hacks For Fast Hair Growth).. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाची पानं आणि फुलं लागणार आहेत.(homemade hibiscus flower gel for long and shiny hair)

 

केसांची वाढ चांगली होण्यासाठी उपाय

केसांची वाढ भराभर होण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा आणि फुलांचा कसा वापर करता येऊ शकतो, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ healthyhabits648 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तुम्ही खूप भराभर जेवण करता का? बघा वजनावर आणि तब्येतीवर याचा काय परिणाम होतो... 

हा उपाय करण्यासाठी जास्वंदाची ४ ते ५ फुुलं आणि ८ ते १० पानं घ्या. हा उपाय करण्यासाठी गावरान जास्वंद निवडावा.

जास्वंदाची पानं आणि फुलं स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ती एका भांड्यात घाला आणि त्या भांड्यामध्ये पानं- फुलं बुडतील एवढं पाणी घाला. आता हाताने पानं आणि फुलं कुस्करून घ्या. हळूहळू जसंजसं तुम्ही ती फुलं हाताने चोळाल तसं तसं त्यातून फेस आणि चिकट पदार्थ बाहेर येईल. 

 

पाणी पुर्णपणे चिकट होऊन एखाद्या जेलसारखं झाल्यानंतर ते गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये ॲलोव्हेरा जेल आणि थोडं तेल घाला. हे मिश्रण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरा.

फ्रिजमध्ये नेहमीच खूप बर्फ साचतो? फ्रिज वापरताना लक्षात ठेवा सोप्या ट्रिक्स- बर्फ साचणार नाही

आठवड्यातून एकदा हे पाणी तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास अगदी महिना भरातच केसांची खूप चांगली वाढ होत असल्याचं दिसून येईल. शिवाय केस गळण्याचं प्रमाणही बरंच कमी होईल.

हे पाणी तुमच्या केसांना लावल्यानंतर कोणतंही दुसरं कंडिशनर लावण्याची गरज नाही. कारण घरी तयार केलेल्या या जास्वंदाच्या जेलमुळे केस खूप मऊ आणि चमकदार होतात. 


 

Web Title: homemade hibiscus flower gel for long and shiny hair, how to make hair growth faster, home hacks for fast hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.