प्रत्येकाच्याच मागे कामाची खूप धावपळ असते. त्यामुळे रोजच्या रोज त्वचेची विशेष काही काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. असेच काही दिवस जातात आणि मग आपली त्वचा खूपच निस्तेज, डल दिसते आहे हे जाणवू लागतं. डेडस्किन, टॅनिंगचे प्रमाण वाढल्याने आपला रंगही अगदी काळवंडून जातो. त्वचेची चमक गायब होते. असं होऊ नये म्हणून आता अगदी रोजच्या रोज एका अतिशय सोप्या पद्धतीने त्वचेची काळजी घ्या. यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची अजिबातच गरज नाहीये. हा उपाय करण्यासाठी फक्त साबणाच्या ऐवजी एक खास पदार्थ लावायचा आहे (Home Hacks For Tanning And Dead Skin). तो पदार्थ नेमका कोणता आणि तो कसा तयार करावा, याविषयीची ही खास माहिती...(homemade herbal body scrub for removing tanning and dead skin)
डेडस्किन, टॅनिंग कमी करण्यासाठी काय उपाय करावा?
डेडस्किन आणि टॅनिंग कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती healthy_tipswithme या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी दोन चमचे साखर घ्या आणि ती थोडी कुटून तिची जाडीभरडी पावडर करून घ्या.
Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल
यानंतर साखरेच्या पावडरमध्ये १ चमचा हळद घाला. हळद घालण्यापुर्वी ती थोडीशी भाजून थंड करून घ्या.
यानंतर या मिश्रणामध्ये १ चमचा मध आणि दिड ते दोन चमचे कॉफी पावडर घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून बाटलीमध्ये भरून ठेवा.
यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा कोणताही एखादा माईल्ड शाम्पू किंवा तुमचा नेहमीचा बाॅडी वॉश घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या.
हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी शरीरात दिसतात ४ लक्षणं- चटकन ओळखली तर जीव वाचू शकतो
दररोज आंघाेळ करण्यासाठी साबणाऐवजी हा स्क्रब अंगाला चोळा आणि नंतर धुवून टाका. काही दिवस नियमितपणे वापरून पाहा. तुमची त्वचा तुम्हाला दिवसेंदिवस अधिक चमकदार झाल्यासारखी जाणवेल. कारण या स्क्रबमुळे त्वचेवर डेडस्किन, टॅनिंग राहात नसल्याने ती कायम फ्रेश दिसते.