Join us  

केस रोज गळतात-वाढच नाहीये? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा, १५ दिवसांत वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 11:20 AM

Homemade Hair Toner For Long Hairs : हेअर फॉल टाळण्यासााठी स्वयंपाकघरातील कोणत्या वस्तू फायदेशीर ते समजून घेऊया.

केस गळायला लागले की केस गळणं थांबतच नाही अशी अनेकांची तक्रार असते. (How To Get Long Hairs) केसांना शॅम्पू किंवा  केस गळती कमी करण्याचे तेल लावले तर तेव्हढ्यापुरता परिणाम दिसून येतो. (How To Grow Hairs)  केस वाढवण्याासाठी  घरगुती उपाय बेस्ट आहेत कारण हे उपाय करण्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च लागत नाही.  याशिवाय घरगुती उपायांचे साईड इफेक्ट्सही जाणवत नाहीत. हेअर फॉल  टाळण्यासााठी स्वयंपाकघरातील कोणत्या वस्तू फायदेशीर ते समजून घेऊया. नैसर्गिक हेअर टोनरचा वापर केल्याने १५ दिवसांत केसांची वाढ चांगली होईल. (Hair Care Tips)

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय कोणता?  (Homemade Hair Toner)

मिक्सरच्या भांड्यात कढीपत्ता,  ताज्या एलोवेराची पानं कापून घ्या ही पानं एका मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात कांद्याचे काप घाला, त्यात एलोवेरा जेल आणि व्हिटामीन सी ची कॅप्सूल घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर मिक्सरमधून काढून हे  एका बारीक कापडात किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. हाताने  किंवा स्प्रे बॉटलमध्ये हे टोनर भरून केसांवर स्प्रे करा. या उपायाने केसांची वाढ चांगली होईल आणि केस गळती होणार नाही. 

एलोवेरा जेलमधील औषधी गुणधर्म केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.  याशिवाय कांद्याच्या सालीच्या वापर करून तुम्ही केसांसाठी नॅच्युरल होममेड डाय सुद्धा बनवू शकता. यासाठी कांद्याची सालं भाजून घ्या, कलौंजीच्या बीया भाजा. यात तुम्ही हळदसुद्धा घालू शकता. हळदीतील करक्यूमिन केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतात.

या बियांची आणि कांद्याच्या सालांची पावडर घेऊन याची पेस्ट केसांना लावा. नंतर अर्ध्या तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवा. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी